हिंदु मुलीच्या शोधासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने ‘शिवप्रहार प्रतिष्ठान’च्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या ‘श्रीरामपूर, बेलापूर बंद’ला व्यापार्‍यांचा उदंड प्रतिसाद !

नगर येथील अल्पवयीन मुलीला धर्मांधाने पळवून नेल्याचे प्रकरण

श्रीरामपूर (नगर), १६ ऑगस्ट – बेलापूर येथील लव्ह जिहाद प्रकरणातील १४ वर्षीय हिंदु मुलीला अन्य धर्मीय एका तरुणाने पळवून नेले. पोलिसांना आरोपीचे नाव सांगून, तसेच मोर्चा काढूनही अद्यापपर्यंत आरोपीचा शोध लागला नाही. या घटनेच्या निषेधार्थ १६ ऑगस्ट या दिवशी हिंदु समाजाच्या वतीने ‘शिवप्रहार प्रतिष्ठान’च्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहर आणि बेलापूर गाव बंदचे आवाहन करण्यात आले होते. हिंदु मुलीसाठी पुकारण्यात आलेल्या या बंदला बेलापूर, तसेच श्रीरामपूर येथील हिंदु व्यावसायिक आणि व्यापारी यांनी कडकडीत बंद पाळून केवळ समर्थन दर्शवले नाही, तर लव्ह जिहाद प्रकरणाविषयी हिंदु व्यापार्‍यांमध्ये कशा प्रकारे चीड आहे, हे व्यापार्‍यांनी संघटितपणे दुकाने बंद ठेवून दाखवून दिले आहे. या वेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंद शांततेत पार पडला.

‘बेलापूर बंदमध्ये सहभागी होऊ नका, दुकाने बंद ठेवू नका’, असे काहींनी व्यापार्‍यांना दूरभाष करून कळवले. विशेष म्हणजे आयुष्यभर हिंदूंच्या जिवावर गावात राजकारण करणार्‍यांनी केवळ आपल्याला न विचारता बंद ठेवला; म्हणून अशाप्रकारे दुकाने बंद ठेवू नयेत; म्हणून हे दूरभाष केल्याचे समजते. तरीही अशा प्रकारच्या बेगडी हिंदू म्हणवून घेणार्‍यांचे म्हणणे धुडकावत बेलापुरातील व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली.

आपल्या मुलीचे काही बरे-वाईट तर झाले नाही ना ? अशी शंका तिचे नातेवाईक व्यक्त करत असून ‘पोलीस केवळ आश्वासने देत आहेत. त्यांनी तातडीने अन्वेषण करावे. आमची मुलगी आम्हाला मिळवून द्यावी’, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे.

हिंदु मुलीच्या संरक्षणासाठी पुकारलेला बंद श्रीरामपूरसाठी वैशिष्ट्यपूर्ण असल्याने सर्व व्यापार्‍यांचा बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय !

दळणवळण बंदीमुळे आमची मोठी हानी झालेली आहे. इतर वेळी वेगवेगळ्या कारणांसाठी बंद पुकारला जातो. त्यामुळे आम्ही व्यापारी नेहमी बंदला विरोध करत असतो; पण आजचा बंद हा वेगळ्या कारणासाठी आहे. एका हिंदु मुलीच्या संरक्षणानिमित्त पुकारलेला बंद श्रीरामपूरसाठी वैशिष्ट्यपूर्ण असल्याने सर्व व्यापार्‍यांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ‘प्रत्येकाला आपल्या आया-बहिणींची अब्रू प्रिय असते; परंतु हिंदु समाज संघटित नसल्याने अपप्रवृत्तींना, असे चुकीचे कृत्य करण्याला बळ मिळते. त्यामुळे अशा विषयावर श्रीरामपुरात बंदची आवश्यकता होती’, अशी अत्यंत बोलकी प्रतिक्रिया अनेक व्यापार्‍यांनी व्यक्त केली. या प्रतिक्रियेतूनच श्रीरामपूर शहरातील व्यापार्‍यांच्या मनात नेमकी कुणाची आणि कशाविषयी भीती आहे, हेही दिसून येत आहे.