काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी सरकारने ठोस पावले उचलायला हवीत ! – राहुल कौल, राष्ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून काश्मीर
काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पहाता विस्थापित काश्मिरी हिंदूंना त्यांच्या भूमीत परत आणता येणे शक्य नाही. केंद्र सरकारने काश्मीरमधून ‘कलम ३७०’ (कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा, म्हणजेच हे राज्य विशेष स्वायत्तता असलेले राज्य होते ! कलम ३७० मधील विशेष अधिकारामुळे राष्ट्रपतींना राज्याची घटना विसर्जित करण्याचाही अधिकार नाही.) जरी हटवले असले, तरी काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी ठोस पावले उचलायला हवीत.