हिंदूंवरील आघात थांबवण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे हाच पर्याय ! – विश्वनाथ कुलकर्णी, उत्तरप्रदेश समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
सिंगरौली (उत्तरप्रदेश) – सध्या हिंदूंची स्थिती अतिशय वाईट आहे. धर्मांतर, लव्ह जिहाद, हिंदुत्वनिष्ठ आणि साधूसंत यांच्या हत्या, मंदिरांचे सरकारीकरण असे अनेक आघात प्रतिदिन हिंदूंवर होत आहेत. हे थांबवण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे, हाच पर्याय आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश-बिहार राज्यांचे समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नियमितपणे ‘ऑनलाईन’ साप्ताहिक धर्मशिक्षणवर्ग घेण्यात येतो. या वर्गातील धर्मप्रेमी सौ. पुष्पा मिश्रा यांनी त्यांच्या भागातील महिला आणि युवक यांच्यासाठी एक ‘ऑनलाईन’ बैठक नुकतीच आयोजित केली होती. या बैठकीला संबोधित करतांना श्री. विश्वनाथ कुलकर्णी बोलत होते. या बैठकीला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी प्रत्येक आठवड्याला धर्मशिक्षणवर्ग आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
क्षणचित्रे
१. या बैठकीच्या आयोजनासाठी सौ. पुष्पा मिश्रा यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांनी सर्वांना धर्मकार्याचे महत्त्व सांगून बैठकीला उपस्थित रहाण्याचे आवाहन केले.
२. बैठकीला उपस्थित युवतींनी राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले.
३. उपस्थित महिलांनी प्रत्येक आठवड्याला १ घंटा धर्मकार्यासाठी देण्याची सिद्धता दर्शवली.
४. बैठकीतील विषय ऐकून श्री. मिश्रा पुष्कळ प्रभावित झाले. त्यांनी समितीच्या धर्मकार्याची प्रशंसा केली आणि धर्मकार्यामध्ये यथाशक्ती सहकार्य करण्याची सिद्धता दर्शवली.