राज्यात कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ रुग्णांची संख्या ६६ वर पोचली !
मुंबई – राज्यातील कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ६६ वर पोचली आहे. यामध्ये ३२ पुरुष, तर ३४ स्त्री रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये जळगाव येथे १३, रत्नागिरी १२, मुंबई ११, ठाणे आणि पुणे येथे प्रत्येकी ६, पालघर अन् रायगड येथे प्रत्येकी ३, नांदेड अन् गोंदिया येथे प्रत्येकी २, तर चंद्रपूर, अकोला, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, संभाजीनगर, कोल्हापूर आणि बीड येथे प्रत्येकी १ रुग्ण आहे. यांतील ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.