सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे १०१ नवीन रुग्ण आढळले
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात १६ ऑगस्ट या दिवशी कोरोनाचे १०१ नवीन रुग्ण आढळले, तर एकही मृत्यू नाही. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र २९८ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५० सहस्र ४८ झाली आहे. १६ ऑगस्ट या दिवशी १२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ४६ सहस्र ७५२ झाली आहे. सद्य:स्थितीत १ सहस्र ९९६ रुग्णांवर उपचार चालू आहेत.