दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेले स्वतःचेच छायाचित्र न्याहाळतांना आनंदाची स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे

श्री. मुकुंद ओझरकर

‘१४.९.२०२० या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेल्या ‘श्राद्ध’ या विषयाच्या अनुभूतीचे वाचन मी ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर करत होतो. तेवढ्यात ‘सकाळचे ९.३० वाजले असून नामजपाची वेळ झाली आहे’, हे माझ्या लक्षात आले. संगणकावर दैनिक ‘सनातन प्रभात’चे संकेतस्थळ तसेच उघडे होते. एकीकडे माझा नामजप चालू होता आणि सहज माझे लक्ष संकेतस्थळावरील माझ्या छायाचित्राकडे गेले. कधी नव्हे, ते त्या वेळी मी माझे छायाचित्र बारकाईने न्याहाळत होतो. एक डोळा, दुसरा डोळा, नाक, कपाळ, गाल आणि हनुवटी, या क्रमाने ते दोन वेळा न्याहाळले गेले. त्या वेळी ‘माझ्या तोंडवळ्यातून आनंदाची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवले.’

– श्री. मुकुंद ओझरकर, नाशिक (१४.९.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक