मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य होणार नाही, असे संघटन निर्माण करूया ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद
‘सरकार अधिसूचना देऊन त्या आधारे ठराव करून विशिष्ट मंदिरे कधीही कह्यात घेऊ शकते. त्यामुळे आपल्या मंदिरांवर ही टांगती तलवार आहेच. मोठ्या प्रमाणात निधी येणारी मंदिरे सरकारने कह्यात घेतली आहेत आणि हे पैसे इतर कामांसाठी वापरले जात आहेत. माहिती अधिकाराद्वारे प्राप्त माहितीतून सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये शेकडो कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार, भूमींचे अपव्यवहार, दागिन्यांची चोरी आदी अनेक गंभीर गोष्टी उघडकीस आल्या आहेत. सरकार मुसलमानांच्या भूमींसाठी कोट्यवधी रुपयांचा व्यय करत आहे आणि हिंदूंच्या मंदिरांच्या भूमी मात्र लुटल्या जात आहेत. आपल्या मंदिरांविषयी कुणीही चुकीचे वक्तव्य करण्यास धजावणार नाही आणि वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य करणार नाही, असे प्रभावी संघटन झाले पाहिजे. महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचे विश्वस्त मंदिरांवरील आघातांच्या विरोधात एकत्र येत आहेत. मंदिर विश्वस्तांची महाराष्ट्रभर चालू झालेली चळवळ देशभर पोचवू.’