मेघालयात मुख्यमंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्बने आक्रमण !
जेथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्बने आक्रमण होत असेल, तेथील कायदा आणि सुव्यवस्था कशी असेल, याचा विचारही न केलेला बरा ! – संपादक
शिलाँग (मेघालय) – मेघालयाचे मुख्यमंत्री आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे नेते कोनराड संगमा यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्बने आक्रमण करण्यात आल्याची घटना १५ ऑगस्टला रात्री घडली. संगमा यांच्या घरावर काही अज्ञातांनी पेट्रोल बॉम्ब फेकला आणि तेथून पळ काढला. सुरक्षायंत्रणांच्या सतर्कतेमुळे या घटनेत कुणीही घायाळ झाले नाही किंवा कोणतीही हानी झाली नाही. पेट्रोल भरलेली पहिली बाटली निवासस्थानाच्या पुढच्या भागात, तर दुसरी बाटली घराच्या मागच्या भागात फेकण्यात आली. यामुळे आगही लागली; परंतु चौकीदाराने त्वरित ही आग विझवली.
The government has imposed a curfew in #Shillong and banned mobile internet services https://t.co/MpeBCoSK0C #Meghalaya
— India TV (@indiatvnews) August 16, 2021
विद्रोही नेता चेरिशस्टरफिल्ड थांगख्यू चकमकीत ठार
मेघालयामधील माजी विद्रोही नेता चेरिशस्टरफिल्ड थांगख्यू याला पोलिसांनी चकमकीत ठार केल्यानंतर येथे हिंसाचार चालू झाला आहे. या घटनेनंतर राज्यातील परिस्थिती चिघळत असतांनाच राज्याचे गृहमंत्री लखन रिंबुई यांनी त्यागपत्र दिले.
रिंबुई यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पोलिसांच्या धाडीनंतर चेस्टरफिल्ड यांना कायद्याच्या विरुद्ध जाऊन कारवाई करत मारण्यात आले. या घटनेवर मी दु:ख व्यक्त करतो. चेरिशस्टारफिल्ड याच्या मृत्यूच्या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करणे सोपे जाईल आणि सत्य परिस्थिती सर्वांसमोर येईल. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी. (एका विद्रोही नेत्याच्या समर्थनार्थ बोलणारे मंत्रीपदापर्यंत पोचतात, हे भारतातच शक्य आहे. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते ! – संपादक)