तिरंगा फडकावण्यास विरोध करणार्या विचारसरणीचा निषेध ! – ‘अभाविप’
फोंडा – तिरंगा फडकावण्यास विरोध करणार्या विचारसरणीचा आम्ही निषेध करतो. तसेच सामंजस्याने ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य करणार्या बेटावरील नागरिकांच्या भूमिकेचेही आम्ही स्वागत करतो. बेटावर ध्वजारोहण करण्याचा कार्यक्रम हा राज्यासाठी अभिमानाचा उपक्रम होता. राजकारण्यांनी ‘नौदल ध्वजारोहण करून बेटावर अतिक्रमण करते’, असा गैरसमज पसरवून लोकांना ध्वजारोहणाला विरोध करण्यास परावृत्त केले. या राजकीय विचारसरणीचा आम्ही निषेध करतो, असे मत ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ने (‘अभाविप’ने) येथील क्रांती मैदानात १४ ऑगस्ट या दिवशी आयोजित केलेल्या निदर्शनाद्वारे व्यक्त केले.