सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात १५ ऑगस्ट या दिवशी कोरोनाचे ६७ नवीन रुग्ण आढळले, तर चौघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र २९४ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४९ सहस्र ९४७ झाली आहे. १५ ऑगस्ट या दिवशी ४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ४६ सहस्र ६३१ झाली आहे. सद्य:स्थितीत २ सहस्र १८ रुग्णांवर उपचार चालू आहेत.