परात्पर गुरु डॉक्टरांचे ‘श्रीसत्यनारायण रूप’ पाहून ते ‘गोविंद’ रूपातच असल्याचे अनुभवणे आणि कृतज्ञताभाव जागृत होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘११.५.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७७ वा जन्मोत्सव होता. त्या दिवशी सतत माझ्या मनात ‘गुरुदेव कोणत्या रूपात दर्शन देतील ?’, असा विचार येत होता. त्याच वेळी मी डोळे मिटून प्रार्थना करतांना ‘या वेळी परात्पर गुरु डॉक्टर ‘गोविंद’ रूपात दर्शन देतील’, असे मला वाटले आणि डोळे उघडताच गुरुदेवांना श्रीसत्यनारायणाच्या रूपात पहाताच माझा कृतज्ञताभाव जागृत झाला. श्रीसत्यनारायणाचा आणखी एक अंश गोविंद आहे. त्या वेळी त्यांना पाहून ‘परात्पर गुरु डॉक्टर ‘गोविंद’ रूपातच असून त्यांनी वेगळ्या पद्धतीचे वस्त्रालंकार धारण केले आहेत’, असे मला वाटले. गुरुदेवांनी त्यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी स्थुलातून ‘श्रीसत्यनारायण’ आणि सूक्ष्मातून ‘गोविंद’ रूपात दिव्य दर्शन देऊन माझे जीवन पावन केले; म्हणून माझा कृतज्ञताभाव जागृत झाला. जन्मोत्सवानंतर दोन दिवस झाले, तरी परात्पर गुरु डॉक्टर ‘गोविंद’ रूपात माझ्या डोळ्यांसमोर येत होते आणि विश्वदर्शनासारखे त्यांचे दिव्य दर्शन देत होते.

सौ. भव्या गौडा

हे सर्व भावाच्या स्तरावरील विचार केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला अनुभवता आले. त्यासाठी गुरुदेव आणि श्रीकृष्ण यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. भव्या गौडा, मंगळुरू, कर्नाटक. (११.७.२०१९)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक