पुणे येथील वक्फ मंडळाच्या नोंदणीकृत संस्थेला शासनाकडून प्राप्त निधी परस्पर लाटणार्या २ धर्मांधांना अटक !
७ कोटी ७६ लाख ९८ सहस्र रुपयांचा निधी परस्पर लाटला
मुंबई – पुणे येथील ‘ताबूत इनाम इंडोमेंट ट्रस्ट’ला शासनाकडून प्राप्त झालेला ७ कोटी ७६ लाख ९८ सहस्र रुपयांचा निधी परस्पर लाटण्यात आला आहे. खोट्या कागदपत्रांद्वारे ट्रस्टचे पदाधिकारी असल्याचे दाखवून इम्तियाज मोहमद हुसेन शेख आणि चांद रमजान मुलाणी यांनी ही रक्कम स्वत:च्या खात्यात जमा करून घेतली. या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
‘ताबूत इनाम इंडोमेंट ट्रस्ट’ ही महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची नोंदणीकृत संस्था असून या मंडळाकडील ५ हेक्टर भूमी राजीव गांधी तंत्रज्ञान प्रकल्पासाठी शासनाकडून अधिग्रहित करण्यात आली आहे. याची भरपाई अनेक दिवस प्राप्त न झाल्यामुळे वक्फ मंडळाकडून भूसंपादन उपजिल्हाधिकार्यांकडे चौकशी केली असता हा अपहार उघड झाला. त्यानंतर वक्फ मंडळाकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केली. याविषयी उपजिल्हाधिकार्यांकडे केलेल्या तक्रार अर्जावर कारवाई झाली नसल्याचा आरोपही वक्फ मंडळाकडून पोलिसांकडे करण्यात आलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. (उपजिल्हाधिकार्यांकडे करण्यात आलेल्या तक्रारीवर कारवाई का झाली नाही ? प्रशासनातील अधिकारीही या अपहारात सहभागी आहेत का ? याचीही चौकशी व्हायला हवी. – संपादक) अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी ‘वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारकडून कडक पावले उचलली जातील’, असे म्हटले आहे.