स्वातंत्र्यदिनी मंत्रालयाच्या बाहेर अंगावर रॉकेल ओतून शेतकर्याचा आत्मदहनाचा प्रयत्न !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आगमनप्रसंगी घडला प्रकार
मुंबई – स्वातंत्र्यदिनी मंत्रालयाच्या बाहेर सुनील गुजर या शेतकर्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तेथे पहार्यासाठी असलेल्या पोलिसांनी हा प्रकार रोखल्याने अनर्थ टळला. मंत्रालयातील ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गाडीतून बाहेर येत असतांना हा प्रकार घडला. पोलिसांनी गुजर यांना मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेले असून झालेल्या प्रकाराचे अन्वेषण चालू आहे. गुजर हे जळगाव येथील रहिवासी असून मका आणि सोयाबीन यांच्या व्यवहारात अडचण आल्यामुळे गुजर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, असे प्राथमिक अन्वेषणातून पुढे आले आहे. याविषयी पोलिसांकडून अधिक अन्वेषण चालू आहे.