तेलंगाणातील बोधन (जिल्हा इंदूर) येथील धर्मप्रेमींनी मंदिर परिसरातील देवतांच्या चित्रांचे वहात्या पाण्यात केले विसर्जन !
इंदूर (तेलंगाणा) – अनेक जण मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या वृक्षांच्या खाली देवतांची चित्रे ठेवतात. त्यामुळे देवतांचे विडंबन होते. हे विडंबन होऊ नये, यासाठी बोधन येथील धर्मप्रेमींनी नुकतेच गावात असलेल्या विविध मंदिरांच्या परिसरात असलेल्या देवतांची अशी चित्रे एकत्र करून ती नदीच्या वहात्या प्रवाहामध्ये भावपूर्ण विसर्जन केली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तेलंगाणातील बोधन येथील धर्मप्रेमींची साप्ताहिक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये प्रत्येक आठवड्याला एक उपक्रम राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याप्रमाणे या आठवड्यामध्ये वरील उपक्रम राबवण्याचा निर्धार धर्मप्रेमींनी केला होता. वरील उपक्रम पूर्ण झाल्यानंतर सर्व धर्मप्रेमींनी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमामध्ये सर्वश्री शंकर, रविंदर, ब्रह्मम्, हनमण्डलु, लोकेश, संयोष यांनी सहभाग घेतला.