फाळणीच्या वेदना !
संपादकीय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘१४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृतीदिन’ म्हणून ओळखला जाईल’, असे घोषित केले. त्यांनी ट्वीटद्वारे सांगितले की, फाळणीच्या वेदना विसरू शकत नाहीत. द्वेष आणि हिंसाचार यांमुळे आपल्या लाखो बंधू-भगिनी यांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. काहींना जीव गमवावा लागला. या संदर्भात वृत्तवाहिन्यांवर बातम्या देतांना ‘या दिवशी देशाचे विभाजन झाले, दंगली उसळल्या, भारतातून पाकिस्तानात आणि पाकिस्तानातून भारतात लोकांनी भरलेल्या, लोकांच्या मृतदेहांनी भरलेल्या ट्रेन पाठवण्यात आल्या इत्यादी स्वरूपाची त्रोटक माहिती तीही संदर्भ तोडूनमोडून सांगितली जाते. त्यामुळे ‘१४ ऑगस्टला झालेली फाळणी ही तात्कालिक दोन धर्मांमध्ये काहीतरी वाद उद्भवून झाली आहे’, असे पहाणार्याला वाटू शकेल. आताच्या पिढीला फाळणीचा इतिहास ठाऊक नाही. फाळणीत नेमके काय घडले ? फाळणी का झाली ? हा भाग माहिती न होता ‘फाळणीच्या वेदना म्हणजे केवळ दंगल झाली, विस्थापन झाले’, एवढेच काहीतरी लक्षात राहील.
जिनांची ‘डायरेक्ट ॲक्शन’
१४ ऑगस्ट म्हणजे भारतमातेच्या मस्तकावरील भळभळती जखम आहे. याच दिवशी भारतापासून फुटून पाक हा भारतद्वेषी देश जन्माला आला. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला’, असे खोटेनाटे काँग्रेसने कितीही सांगितले, तरी त्यावर जनता विश्वास ठेवणार नाही. वर्ष १९४६ मध्ये म्हणजे भारताच्या फाळणीपूर्वी मुसलमान संघटनांनी अखंड भारतात मुसलमानांना कोणते स्थान असावे ?, याविषयी सांगितले. त्यात काही मागण्या मांडण्यात आल्या होत्या. त्या मागण्यांमध्ये ‘प्रशासकीय सेवा, सैन्य येथे मुसलमानांना ५० टक्के राखीव जागा हव्यात. ६६ टक्के मुसलमान सदस्यांच्या संमतीविना घटनेत काही पालट केला जाऊ नये, मुसलमान देशाशी करार करतांना ६६ टक्के मुसलमान सदस्यांची संमती हवी’, यांचा समावेश होता. या मागण्या अतिशय भयावह होत्या. त्यांना मान्यता देणे म्हणजे भारतात अनेक पाकिस्तान निर्माण करण्यास अनुमती दिल्यासारखेच झाले असते. या मागण्यांना नकार दिल्यास भारतद्वेषी महंमद अली जिना त्यांची ‘डायरेक्ट ॲक्शन’ची (थेट कृती) योजना घेऊन सिद्धच होते. मागण्या मान्य होत नाहीत, हे लक्षात आल्यावर १६ ऑगस्ट १९४६ चा भयंकर दिवस उजाडला. त्या दिवशी ठरलेल्या योजनेनुसार जिना यांच्या नेतृत्वाखाली सहस्रो धर्मांध तलवारी आणि अन्य शस्त्रे घेऊन रस्त्यावर उतरले अन् हिंदूंच्या भयंकर नरसंहाराला प्रारंभ झाला. दिसेल त्या हिंदूंला ठार करणे, घरातल्या मुलीबाळी पळवणे आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करणे हा धर्मांधांचा नित्यक्रम झाला होता. बंगालमध्येच काही भागांमध्ये बलात्कारासाठी छावण्या उभारण्यात आल्या होत्या. त्यामध्ये १४ ते ४५ वर्षे वयोगटातील हिंदु स्त्रियांना डांबून ठेवून अनेक दिवस त्यांच्यावर बलात्कार चालूच होते. हिंदूंची घरे आणि संपत्ती यांची राखरांगोळी करण्यात आली. बंगालचे विभाजन झाले. त्यानंतरही भयावह अत्याचार चालूच होते. काही ठिकाणी मारलेल्या हिंदूंच्या मुंडक्यांचे तोरण बांधण्यात आले होते.
हिंदूंवर नृशंस अत्याचार !
हिंदूंवरील अत्याचाराचे हे लोण पूर्व आणि पश्चिम भारतात वेगाने पसरले. तत्कालीन भारताचा भाग असलेल्या पाकमध्ये हिंदूंच्या कत्तलींना प्रारंभ झाला. हिंदु भयामुळे जीव वाचवण्यासाठी भारताकडे मिळेल त्या वाहनाने पळत सुटायचे; मात्र दबा धरून बसलेले धर्मांध सहस्रो नि:शस्त्र हिंदूंना गाठून त्यांची कत्तल करायचे. लाहोर स्थानकात मारल्या गेलेल्या हिंदूंच्या प्रेतांचा डोंगरच झाला होता. भारतातून ज्या मुसलमानांना पाकमध्ये जायचे असेल, त्यांना रेल्वेद्वारे सन्मानपूर्वक पाठवण्यात येत होते; पण पाकमधून भारतात येणार्या हिंदूंची खैर नव्हती. पाकमध्ये सैनिक आणि पोलीस बेधडक तेथील हिंदूंच्या घरात घुसत, हिंदूंनी बचावासाठी मंदिरांचा आश्रय घेतला, तर बलुची सैनिक मंदिराला वेढा देऊन पुरुष, लहान मुले-मुली यांची हत्या करून तरुण स्त्रियांना पळवत. त्यांच्यावर अनेक दिवस बलात्कार करून आणि त्यांच्या मांडीवर पाकिस्तान हे नाव गोंदवून त्यांची भारतात पाठवणी केली जायची. हे अत्याचार एवढे भीषण होते की, क्रूरकर्मा तैमूरलंगालाही लाज वाटली असती. कलिपुरुष जिना यांच्यामुळे हिंदूंच्या रक्ताच्या नद्या वाहून भारताचे तुकडे झाले. हिंदूंनी काही प्रमाणात प्रतिकार केला; मात्र धर्मांधांच्या क्रौर्याच्या तुलनेत तो विशेष नव्हता.
हिंदूंवरील अत्याचारांच्या सत्य कथा भाषाप्रभु पु.भा. भावे यांनी प्रत्यक्ष अत्याचारांच्या ठिकाण जाऊन, तेथील भीषण परिस्थिती पाहून लिहिल्या आहेत. त्यातील काही गोष्टी तर जाहीर सांगू शकत नाहीत, एवढ्या भीषण आहेत. फाळणीचा विस्तृत इतिहास खरेतर पाठ्यपुस्तकांत प्रसिद्ध करायला हवा होता; मात्र तो कुणाच्या तरी भयामुळे अथवा लांगूलचालनामुळे काँग्रेसकडून दाबला गेला. ‘जे राष्ट्र स्वत:चा इतिहास विसरते, त्याचा भविष्यकाळही अंधकारमय असतो’, असे सांगितले जाते. भारतियांना त्यांच्यावरील मोगलांच्या अत्याचारांचा, त्यांना तोंड देणार्या पराक्रमी हिंदु राजांचा इतिहास विसरण्यास लावण्याचे मोठे षड्यंत्र एन्.सी.ई.आर्.टी.च्या माध्यमातून रचले गेले. त्यात फाळणीच्या इतिहासाचीही भर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत चाणाक्षपणे हा दिवस फाळणीचा दिवस घोषित करून तेव्हाच्या भयावह स्मृती पुन्हा जागृत केल्या आहेत. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मात्र हा दिवस घोषित केल्याविषयी थयथयाट केला आहे. हिंदूंच्या आताच्या पिढीला पाकच्या निर्माणकर्त्यांची, इम्रान खान यांच्या पूर्वजांची क्रूरता कळली, ती जगाला कळली, तर सर्वजण त्याविषयी खडसावतील, तर ‘आतंकवाद्यांसाठी हक्काचे ठिकाण झालेल्या पाकला तोंड दाखवायला जागा उरणार नाही’, असे इम्रान खान यांना वाटत असावे. या हत्याकांडांविषयी पाकने भारतियांची क्षमा मागणे आवश्यक आहे; मात्र असे करेल, तर तो पाक कुठला ? भारतियांनी पाकविरुद्ध सूडाग्नी धगधगत ठेवून योग्य वेळी त्याला जगाच्या नकाशातून नष्ट करून आणि ‘अखंड भारत’ साध्य केल्यास प्राण गमावलेल्या हिंदूंना ती खरी श्रद्धांजली ठरेल !