सोसायटीच्या जागेवर पोलीस ठाण्याने आक्रमण केल्याचा रहिवाशांचा आरोप !
पुणे – कोंढवा येथील सुसवाणी कॉम्प्लेक्स सहकारी गृहरचना संस्थेच्या जागेवर सुशोभिकरणाच्या नावाखाली कोंढवा पोलीस ठाण्याने अतिक्रमण केले. सोसायटीच्या पदाधिकार्यांनी महापालिकेकडे तक्रारी करून अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे. ही जागा सोसायटीच्या मालकीची नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याविषयी पोलीस आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचे रहिवाशांनी सांगितले.