गोव्यातून पुण्यात आलेला विदेशी मद्याचा साठा जप्त !
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
पुणे, १५ ऑगस्ट – राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोव्यातून पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आलेला विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे. टेम्पोमध्ये ठेवण्यात आलेल्या ४५० खोक्यांमधील ५ सहस्र ४०० मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. टेम्पोसह जप्त केलेल्या मुद्देमालाचे शुल्क ४६ लाख रुपये एवढे आहे.
महाराष्ट्रात गोवा राज्यातील मद्यविक्रीस प्रतिबंध आहे. तरीही अवैधरित्या मद्याची वाहतूक करण्यात आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यामद्य प्रकरणी एकनाथ लोके याला मुंबई दारूबंदी कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे.