‘बीबीसी मराठी’च्या इन्स्टाग्राम खात्यावर व्यंगचित्र प्रसारित करून हिंदूंना धार्मिकतेच्या नावाखाली हिंसाचारी दाखवले !
बीबीसीचा हिंदूद्वेष !
|
मुंबई, १५ ऑगस्ट (वार्ता.) – बीबीसी या वृत्तसंस्थेच्या ‘बीबीसी मराठी’ या इन्स्टाग्राम खात्यावर एक व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले आहे. त्याद्वारे हिंदूंना धार्मिकतेच्या नावाखाली कट्टरतावादी आणि हिंसक दाखवले आहे. मुसलमान व्यक्तीला मारहाण करून त्याला ‘जय श्रीराम’ म्हणण्यास लावण्यात आल्याच्या कथित वृत्ताचा संदर्भ देत ‘बीबीसी मराठी’ने हिंदूंना आक्रमक दाखवले आहे. या व्यंगचित्रमध्ये पालक अन्य एका पालकांशी बोलतांना म्हणतात, ‘‘आमचा मुलगा पुष्कळ धार्मिक आहे हो. लोकांना बदडून बदडून देवाचे नाव घ्यायला लावतो.’