तोतया पोलीस निरीक्षकास पुणे रेल्वे स्थानक परिसरात अटक !
पोलिसांचे भय नसलेले गुन्हेगार !
पुणे, १४ ऑगस्ट – मुंबईत पोलीस निरीक्षक असल्याचे सांगून रेल्वे स्थानक परिसरातील वसतीगृहामध्ये रहाणारा सराईत गुन्हेगार पवन उपाख्य मिलिंद सावंत याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबईतील काही पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंद आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.