संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणा !
‘वन्दे मातरम्’ हे संस्कृत भाषेमध्ये असल्याने, तसेच त्यात मातृभूमीला वंदन आणि तिची स्तुती असल्याने त्यात चैतन्य आणि शक्ती आहे. त्यामुळे राष्ट्राविषयीची अस्मिता वाढून राष्ट्रनिष्ठा प्रबळ होते ! स्वातंत्र्यापूर्वीच मुसलमानांचा या गीताला विरोध झाल्याने ‘वन्दे मातरम्’ची शेवटची ४ कडवी, ज्यात मातृभूमी ही देवीस्वरूपात असल्याने तिला वंदन केले आहे, ती वगळून पहिली २ कडवी ज्यात तिच्या सृष्टीसौंदर्याचे वर्णन येते, त्यांनाच केवळ राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने संमत करून घेतला आणि नंतर तेच शाळांमधून आणि सर्वत्र म्हटले जाऊ लागले. यापुढे संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ प्रत्येक ठिकाणी म्हणावे.