भारत धर्मनिरपेक्ष का नको ?
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला धर्मनिरपेक्ष घोषित करण्यात आले. गेली ७४ वर्षे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ‘मुसलमानांचे तुष्टीकरण आणि हिंदूंवर अन्याय’ हीच नीती अवलंबली जात आहे. मुसलमानांसाठी पाकचे विभाजन झाल्यावर ते इस्लामी राष्ट्र झाले, तर भारत हिंदूंचे राष्ट्र का झाले नाही ? जगातील सर्वच्या सर्व राष्ट्रे धर्माधिष्ठित असतांना केवळ भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र ठेवण्यामागे बहुसंख्य हिंदूंचे ‘हिंदु राष्ट्र’ होऊ न देता हिंदूंचे दमन करणे हाच कुटील हेतू असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे आता परत एकदा भारतातील धर्मनिरपेक्षतेचा खोटेपणा पडताळून पहाणे आणि भारतीय राज्यघटनेतील त्याचा उल्लेख काढून टाकणे का क्रमप्राप्त झाले आहे ? ते पाहू.
१. भारतातील धर्मनिरपेक्षतावाद कसा बेगडी आहे, हे जाणा !
१ अ. ‘भारतीय परिभाषेतील ‘धर्मनिरपेक्षतावाद’ हा छद्म (खोटा) अन् हास्यास्पद आहे.’ – श्री. बी.आर्. हरन, ज्येष्ठ पत्रकार
१ आ. ‘भारतात धर्मनिरपेक्षवाद म्हणजे केवळ हिंदुत्वाचा अपमान आणि कळत-नकळत भारतविरोधी शक्तींना साहाय्य !’ (ठेंगेपर सब मार दिया, मे-जून २०१०)
१ इ. शासनकर्त्यांचा बेगडी धर्मनिरपेक्षतावाद : ‘आज भारतात ‘धर्मनिरपेक्षता आणि निधर्मीपणा’ हे शब्द चॉकलेटहून अधिक चघळले जातात. धर्माकडे स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञाननिष्ठ किंवा राष्ट्रीय दृष्टीकोनातून पहात. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुसलमानविरोध हा राष्ट्रीय दृष्टीकोनातून आहे. हिंदूंचा पक्ष घेणारे सावरकर धर्मनिरपेक्ष भूमिकेचा प्रचार करतांना दिसतात, तर धर्मनिरपेक्षतेचा दावा करणारी काँग्रेस धार्मिक भूमिकेतून मुसलमानांकडे पहात असलेली दिसते. एकगठ्ठा मतांसाठी ‘शहाबानो’ केस उद्भवली. मुसलमानांचे लांगूलचालन, हज यात्रेला सवलती, इमामांची विखारी भाषणे आणि फतवे सहन करणे, राष्ट्रपतीपदी किंवा उपराष्ट्रपतीपदी तरी मुसलमान व्यक्तीच असावी, असे आजकालच्या शासनकर्त्यांना वाटते. त्यांचा धर्मनिरपेक्षतावाद तो हा…. पण तो बेगडी आहे.’ – श्री. मनोहर जोगळेकर (‘स्वातंत्र्यवीर’ दिवाळी विशेषांक २०१०)
१ ई. भारतातील धर्मनिरपेक्षतावाद्यांचा कार्यक्रम
१. ‘अल्पसंख्याकांना मूर्ख बनव.
२. इफ्तार निमित्त प्रीतीभोजन (पार्ट्या) दे. त्या वेळी त्यांना मुसलमानांची टोपी घाल !
३. दिवाळी, होळी गेले उडत. केवळ ईद साजरी कर. त्यानिमित्त (मुसलमानांची) गळाभेट घे, अत्तर लाव. हसून प्रतिसाद दे.
४. आतंकवाद्यांना ‘हुतात्मा’ म्हण. त्यांच्या घरी जा. त्यांचे सांत्वन कर.
५. हिंदु हुतात्म्यांचा संशय घे. त्यांच्या हौतात्म्याविषयी शंका उपस्थित कर.
६. प्रत्येक घटनेला सांप्रदायिक रंग दे. हिंदूंच्या चौकशीची मागणी कर.
७. संसदेतील वातावरण तापव. ते करण्यास मुळीच संकोचू नकोस. तुझे कोण काय वाकडे करणार आहे ?
८. तू अल्पसंख्याकांचा मंत्री आहेस. तुला जितके लुटता येईल, तितके लूट. हिंदुस्थान कुणाच्या (आपल्याच) बापाचा आहे ?
९. दर्ग्यात (मजार) जा. तेथे चादर चढव.
१०. दाढी ठेव.
११. कधी साधू, कधी विद्वान किंवा पंडित (उलेमा) बनून आपला स्वार्थ साधून घे.
१२. हज हाउस बांध. हजयात्रेला अनुदान दे.
१३. शासकीय संपत्तीची लूट कर. एवढे स्वातंत्र्य तुला कुठे मिळणार ?
१४. नंतर ‘पैगंबरी आवाजात’ बोल – मला (मुसलमानाला) अनन्यभावे शरण जा. म्हणजे त्याचा (अनन्यभावाने शरण जाणार्याचा) योगक्षेम मी वहातो.’
– किशोरीलाल व्यास (ठेंगेपर सब मार दिया, मे-जून २०१०)
२. ही असमानता धर्मनिरपेक्ष कशी ठरते ?
२ अ. शरियत मानणारी; पण श्रुति-स्मृति-पुराणांचे प्रामाण्य न मानणारी राज्यघटना म्हणे सर्व धर्मांना समान मानते ! : ‘निधर्मी म्हणजे सर्वधर्म समत्व, तशी घटना आहे’, असे हे (साम्यवादी) मित्र सांगतात. सर्व धर्माचे प्रामाण्य मानायचे ना, मग आमची घटना हिंदूंच्या श्रुति-स्मृति, पुराणांचे प्रामाण्य कुठे मानते ? ‘हिंदु कोड बील’ ही हिंदु धर्माची मोडतोड नाही का ? आमच्या धर्मात ढवळाढवळ नाही का ? दिवाणी कायद्याखाली येणारी कोणतीही गोष्ट शरियतला धरून आहे कि नाही, याची चर्चा न्यायालय करते. श्रुति-स्मृति-पुराणांचे प्रामाण्य आमचे सरकार मानीत नाही आणि शरियतचे प्रामाण्य मानते ! मग ‘आमची घटना सर्व धर्मांना समान मानते’, हा दावा कसा करता येईल ?’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, २४.१२.२००९)
२ आ. धर्मनिरपेक्षतावाद्यांनो, या प्रश्नांची उत्तरे द्या ! : ‘आम्ही नावाला धर्मनिरपेक्षतावादी आहोत; परंतु आम्ही सतत अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक असा घोष करत असतो, हीच आमच्या देशाची विटंबना आहे. आमच्या मानगुटीवर अल्पसंख्यांकांचे भूत बसलेले आहे. देशात आणि विदेशात देवालये उद्ध्वस्त झाली; पण त्यांच्या पुनर्बांधणीविषयी आम्ही शब्दही तोंडातून काढत नाही. हिंदू केवळ बहुसंख्यांक आहेत; म्हणून रक्षणास पात्र नाहीत का ? साम्यवादाचा अर्थ म्हणजे केवळ एकाचे लाड करणे असा आहे का ? येथे दंगलींचा खरे अन्वेषण (तपास) होत नाही. ‘सर्व गुन्हे हिंदु धर्मियांचे आहेत’, असे गृहित धरले जाते आणि त्यांच्याच माथी ते मारले जातात.
या धर्मनिरपेक्षतावाद्यांना विचारा –
१. हे धर्मनिरपेक्षवादी मंदिरात पूजा का करतात ?
२. ते त्यांच्या गुरूंच्या पाया का पडतात ?
३. अल्पसंख्यांकांना प्रभावित करण्यासाठी त्यांच्या उरूसामध्ये सहभागी का होतात ?
४. चर्चच्या प्रार्थनासभांत सहभागी का होतात ?
५. हे धर्मनिरपेक्षतावादी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांमध्ये सहभागी होण्याचे प्रदर्शन का करतात ?
६. ते हिंदूंच्या रीतीभातींमध्ये धर्मनिरपेक्षवादाच्या नावावर हस्तक्षेप का करत असतात ?
७. ते इस्लामी कट्टरवादाची निंदा का करत नाहीत ?
८. ते इस्लामी कट्टरवाद्यांपुढे भीतीने कापायला का लागतात ?
९. या प्रश्नांवर उघडपणे प्रतिवाद का नाही करत ?
१०. मुसलमानांच्या धार्मिक भावना पवित्र मानतात, हिंदूंच्या भावनांना विकृती का मानतात ?
११. आम्ही जगातले पहिले किंवा दुसरे इस्लामी राष्ट्र आहोत, याचा आम्हाला अभिमान का असावा ?
१२. आम्ही जातीय एकोप्याच्या/सलोख्याच्या नावावर तमाशे करतो. कधी नबाबी विलासीपणाला गंगायमुना संस्कृतीच्या रूपात प्रदर्शित करतो (तिला भारतीय संस्कृती म्हणतो), तर कधी हिंदूंच्या पंथनिरपेक्षतेची चेष्टा करतो.
१३. अल्पसंख्यांक मुसलमानांना भारतीय संस्कृतीचा स्वीकार करायला का नाही सांगत ? ’
– विद्यानिवास मिश्र (ठेंगेपर सब मार दिया, मे-जून २०१०)
३. धर्मनिरपेक्ष राज्यपद्धतीचे दुष्परिणाम !
३ अ. ‘अधर्माचरणास धर्मनिरपेक्ष शासनपद्धतीच कारणीभूत आहे !’ – द्वारका ज्योतिष पिठाचे शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती
३ आ. धर्माचे बंधन नसले की अनैतिक वागण्याला रोखणारे कुणी नसते !
‘धर्मनिरपेक्ष झाले की, जगाला अंतिम कल्याणाचा संदेश देता येतो. मानवाची तर्कबुद्धी मारून टाकण्याच्या भयानक आणि अमानुष प्रकारांना मानवतेच्या अलंकारांनी भूषित करता येते. मानवाचे अनिष्ट, अकल्याण करणार्या सुपत सुडाच्या वासनेला लोककल्याण, समाजकल्याण आणि क्रांती यांचे सोज्वळ रूप देता येते.
कुंपणाच्या बाहेर असलेल्या गवताप्रमाणे समाजाच्या नीतीनियमांचा चोळामोळा करून जगणे आणि मरणे यांची खास शैली निर्माण करता येते. साहित्यिकांत प्रतिष्ठा मिळवीत अत्यंत किळसवाण्या, अश्लील चिंतनाला वाट देतांना नामवंत वक्त्यांच्या जिभेवर किडे वळवतात. सर्व शब्दसंपदांचा वापर करून अर्थहीन बोलता येते, ज्या धर्मनिरपेक्ष माणसाला अनीतीची नीती, स्वातंत्र्याचा स्वैराचार अन् अश्लीलता करता येते, त्याला ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणतात. धर्मनिरपेक्ष स्त्री-पुरुषाला मुक्त स्वातंत्र्य (नव्हे स्वैराचार करणे; कारण स्वातंत्र्यात बंधने असतात.) असते. लग्नाविना प्रेयसी वा प्रियकर याच्यासमवेत रहाता येते.
एक भारतीय जगप्रसिद्ध साहित्यिका आहेत. भारताची सर्व साहित्यविषयक पारितोषिके (अवॉडर््स) त्यांना मिळालेली आहेतच. त्या संपूर्ण जगातल्या एका प्रसिद्ध चित्रकार प्रियकरांसमवेत रहातात. तो प्रियकर सांगतो, ‘लग्न न करता जर शेजार्याची बायको पळवता येते, शेजार्याच्या पत्नीला पतीचे प्रेम देता येते, पत्नी म्हणून अहोरात्र भोगता येते, तर लग्नाची आवश्यकताच काय ? लग्नाविना आम्ही परस्परांवर अधिक प्रेम करतो. कॅनव्हासवर तो प्रेयसीचे चित्र काढतो आणि ती त्याच्या मुक्त प्रेमाच्या कथा, कादंबर्या आणि कविता लिहिते.
धर्मनिरपेक्ष झाले की, मद्य झोडता येते. रंजनगृहात (क्लब) जाता येते. ख्रिस्ती, मुसलमान, निग्रो अथवा कुणासमवेतही संभोग करता येतो. बुद्धीवादी, विज्ञानवादी म्हणवून समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून घेता येते. बलात्कार झाला, तर त्यालाच सहयोग देऊन स्त्रीला मुक्त प्रतिहित जीवन जगता येते. वेश्येला (कॉलगर्लला) प्रतिष्ठा मिळते. बापाला वेडे ठरवून त्याची संपत्ती घेता येते.
उपयुक्ततावाद तत्त्वज्ञान मुक्त स्वीकारता येते. म्हणजे आई-बाप म्हातारे असतील, तर त्यांना मारून त्यांच्या मूत्रपिंडासारख्या अवयवांचा उपयोग होतो. म्हातार्यांना मारून त्यांचे अन्न तरुणांना देता येते. समाज बलवान करता येतो. दूरच्या नातेवाइकांसमवेत संबंध ठेवता येतो. ‘गर्लफ्रेंड’, ‘फ्रेंडशिप डे’ यांसारखी आणखी काय काय थेर आहेत, ती करता येतात. फसवणे, विश्वासघात आणि हत्या करता येते.
धर्मनिरपेक्षतेचे अमानुष तत्त्वज्ञान (logic) वापरून स्वत:च्या अपकृत्यांना सत्यकृत्याचे आवरण घालता येतो. परिक्षिताने कलीला द्युत, मद्य, व्यभिचार आणि हिंसा ही चार स्थाने दिली. या चारही स्थानांना विलक्षण प्रतिष्ठा देता येते. ‘धर्मनिरपेक्ष, विज्ञाननिष्ठ, बुद्धीवादी’ म्हणवून घेता येते.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी, (साप्ताहिक सनातन चिंतन, १३.१.२०११)