सातारा शहरामध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढले !
सातारा, १४ ऑगस्ट (वार्ता.) – शहरातील करंजे, गोडोली, सदरबझार, मंगळवार पेठ या भागांमध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढले आहे. अनेकजण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. पावसाचे पाणी साठून राहिल्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. आरोग्य विभागाकडून साथीच्या आजाराने आजारी असल्याचा अहवाल जिल्हा हिवताप कार्यालयाकडे आला आहे. या परिसराची पहाणी सातारा नगरपालिका आणि जिल्हा हिवताप कार्यालयाकडून करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या साहाय्याने धूर फवारणी चालू आहे; मात्र काही धूर फवारणी यंत्र बंद स्थितीत असल्यामुळे धूर फवारणीचे काम मंद गतीने चालू आहे. (फवारणी यंत्र बंद स्थितीत का आहे, हे शोधून संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. – संपादक)