१४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृतीदिन’ म्हणून ओळखला जाणार ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

फाळणीच्या वेळी महंमद अली जिना यांच्या ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’मध्ये (थेट कारवाईमध्ये) मारल्या गेलेल्या हिंदूंना प्रतिवर्षी भारत सरकारने श्रद्धांजली देऊन त्यांची आठवण काढली पाहिजे ! – संपादक

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृतीदिन’ (विभाजन विभीषिका स्मृति दिवस) म्हणून ओळखला जाईल, असे घोषित केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीट करून म्हणाले की, देशाच्या फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाहीत. द्वेष आणि हिंसाचार यांमुळे आपल्या लाखो बंधू-भगिनींना स्थलांतरित व्हावे लागले आणि काहींना तर त्यांचा जीवही गमवावा लागला. त्या लोकांच्या संघर्ष आणि बलीदान यांची आठवण ठेवत १४ ऑगस्टला ‘फाळणी वेदना स्मृतीदिन’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस आपल्याला भेदभाव, शत्रूत्व आणि द्वेष संपवण्यासाठी केवळ प्रेरणा देणार नाही; तर यामुळे एकता आणि सामाजिक सद्भावना भक्कम होतील.