भारतासह १२ देशांकडून अफगाणिस्तानमध्ये तालिबानला ‘राज्यकर्ते’ म्हणून मान्यता देण्यास विरोध
केवळ बाराच देश का ? जगातील सर्वच देशांनी तालिबानचा विरोध करून त्याचे शासन आल्यास अफगाणिस्तानवर बहिष्कार घातला पाहिजे !
नवी देहली – भारत, अमेरिका, चीन यांसह १२ देशांनी अफगाणिस्तानात बलपूर्वक सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार्या तालिबान्यांना ‘राज्यकर्ते’ म्हणून मान्यता देण्यास विरोध दर्शवला आहे. इतर देशांमध्ये पाकिस्तान, कतार, उझबेकिस्तान, ब्रिटन, जर्मनी, नॉर्वे, ताझिकिस्तान, तुर्की आणि तुर्कमेनिस्तान यांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रे आणि युरोपियन महासंघ यांनीही विरोध दर्शवला आहे. अमेरिकेने तालिबानी आक्रमणाला विरोध दर्शवत शहरांवरील आक्रमणे तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे.