कूळ-मुंडकार, वनहक्क, बांधकामे अधिकृत करणे आदी प्रकरणे सोडवण्याची प्रक्रिया गतीने करणार ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

डॉ. प्रमोद सावंत

पणजी, १३ ऑगस्ट (वार्ता.) – कूळ-मुंडकार, वनहक्क, तसेच अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासंबंधीची प्रलंबित असलेली प्रकरणे सोडवण्याची प्रक्रिया जलद गतीने करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. ते म्हणाले, ‘‘अशा प्रकरणांमध्ये जे अडथळे असतील, त्यावर उपाययोजना काढून ती प्रकरणे जलद सोडवण्याची प्रक्रिया शासन करेल.’’

१३ ऑगस्टला त्यांनी सर्व तालुक्यांचे मामलेदार आणि उपजिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली होती. या वेळी त्यांनी ‘अशा प्रकरणांविषयी निर्णय जलद होण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांनी न्यायालयातील खटल्यांना उपस्थित रहावे. यामुळे न्यायालयाचा निर्णय झाल्यावर पुढील निर्णय घेणे सोपे जाईल’, असा सल्ला त्यांनी अधिकार्‍यांना दिला.