गुरुकृपेने कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात करणार्या जत (जिल्हा सांगली) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वासंती देवानंद वाघ (वय ७३ वर्षे) !
१. बरे वाटत नसल्याने आधुनिक वैद्यांकडे जाऊन पडताळणी करणे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे शस्त्रकर्म करवून घेणे
‘ऑक्टोबर २०२० मध्ये मला बरे वाटत नसल्याने मी आधुनिक वैद्यांकडे जाऊन पडताळणी केली. तेव्हा त्यांनी ‘शस्त्रकर्म करावे लागेल’, असे सांगितले. त्यानुसार मी तत्परतेने शस्त्रकर्म करवून घेतले आणि चौथ्या दिवशी रुग्णालयातून घरी आले.
२. शस्त्रकर्म झाल्यावर रुग्णालयातून घरी आल्यानंतर सनातन पंचांगांचे वितरण करणे
मला सनातन पंचांगांचे वितरण करायचे होते. मी यजमानांच्या मित्रांना पंचांगासाठी दूरभाष केल्यावर ते म्हणाले, ‘‘वहिनी, तुमचे शस्त्रकर्म झालेले समजले. तुम्ही बर्या आहात ना ?’’ मी म्हणाले, ‘‘मी बरी आहे. ‘तुम्हाला वर्ष २०२१ चे सनातन पंचांंग हवे का ?’, हे विचारण्यासाठी मी भ्रमणभाष केला आहे.’’ यजमानांचे मित्र, इतर काही जिज्ञासू आणि नातेवाईक यांच्याकडून मी पंचांगांची मागणी घेतली आणि त्यानुसार पंचांगांचे वितरण केले.
३. कर्करोग झाल्याचे निदान होणे, नामजप अन् भाववृद्धीचे प्रयोग केल्याने किमोथेरपी अन् रेडिएशन यांचा त्रास न होणे आणि गुरुकृपेने ‘किमोथेरपी’ची ‘सायकल्स’ अन् ‘रेडिएशन’ यांची संख्या न्यून होणे
शस्त्रकर्मानंतर ‘कर्करोगाची गाठ आहे’, असा अहवाल आला. पुढे किमोथेरपी चालू झाली. तेव्हा मला भीती वाटत होती. किमोथेरपीच्या वेळी मी नामजप आणि श्रीकृष्णाची मानसपूजा करत होते. ‘सलाईन’ लावल्यावर मी त्यातही सूक्ष्मातून ‘जय गुरुदेव’ हे नाम भरत होते. त्यामुळे मला काही त्रास होत नव्हता. त्यांच्या कृपेने मला सर्व प्रसंगांतून अलगद बाहेर पडता आले. किमोथेरपीची सहा ‘सायकल्स’ द्यायची ठरली होती; पण श्री गुरुकृपेने त्यांतील दोन न्यून झाली. किमोथेरपीनंतर २५ रेडिएशन (कर्करोगावरील किरणोत्सर्ग उपचारपद्धत) घ्यायची ठरली होती; पण श्री गुरुकृपेने तीही न्यून होऊन १५ घ्यावी लागली. रेडिएशन घेतांना मी पटलावर झोपले की, खोलीत नामजप भरत होते, तसेच भजने म्हणत आणि ऐकत होते. त्या वेळी ‘रेडिएशन कधी संपले ?’, हेही मला कळत नसे.
‘गुरुदेवांनी मला कर्करोगाच्या आजारातून अलगद बाहेर काढले’, यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. वासंती वाघ, जत, जिल्हा सांगली. (२५.३.२०२१)
|