उत्साही आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तळमळीने सेवा करणार्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सविता चौधरी (वय ४५ वर्षे) !
१. ‘सौ. चौधरीकाकू सतत हसतमुख आणि उत्साही असतात.
२. सेवेचा ध्यास
अ. त्यांचे कुटुंबीय साधनेसाठी अनुकूल नाहीत, तरी त्या घरातील सर्व कामे करून सकाळी १० वाजता सेवेला बाहेर पडतात आणि सायंकाळी ७ वाजेपर्यंत सेवा करतात. काकूंकडे विविध दायित्वाच्या सेवा आहेत.
आ. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरकांना कधी वितरण करायला अडचण आल्यास त्या स्वतः घरापासून ८ किलोमीटर येऊन दैनिक वितरण करतात. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण नियमित व्हायला हवे’, अशी त्यांची तळमळ आहे. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी त्यांना सकाळपासून दुपारपर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करायला वेळ द्यावा लागायचा. त्या वेळी ‘आपलीच सेवा आहे’, या भावाने त्या तळमळीने वितरण करायच्या.
इ. साधकांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा गठ्ठा मिळायला अडचण आल्यास काकूंना पहाटेपासून साधकांचे भ्रमणभाष येतात. तेव्हाही काकू घरातील कामे करून सेवेसाठी पहाटेपासून वेळ देतात.
ई. काकू कार्यपद्धतीचे पालन करून सेवा करतात.
उ. त्या ‘शिबिरासाठी साहित्य आणणे आणि परत नेणे’ यांचे नियोजन करतात. साहित्य जड असते किंवा कधी साधकही वेळेत उपलब्ध होत नाहीत, तरी काकू स्वतःहून सेवा करतात.
३. भाव
‘त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे. गुरुदेवांचे नाव ऐकून त्यांची भावजागृती होते.’
– कु. दीपाली मतकर, सोलापूर (६९ टक्के आध्यात्मिक पातळी) (२२.२.२०२०)