‘रोहिंग्या-बांग्लादेशी घुसपैठिए : राष्ट्रीय सुरक्षा पर संकट !’ या विषयावर विशेष ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन !
भारतात शिरलेल्या बांगलादेशी घुसखोरांनी गुन्हेगारी करून थैमान घातले आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांवर अतिरिक्त ताण येत आहे. असे असतांना म्यानमारमधून पळून आलेल्या ४० सहस्र रोहिंग्या मुसलमानांना भारतात स्थायिक करण्यासाठी काही मुसलमान संघटना, तथाकथित मानवतावादी आणि पुरोगामी यांच्याकडून भारत सरकारवर दबाव आणला जात आहे. म्यानमारमधील बहुसंख्य असलेल्या बौद्धांवर अनन्वित अत्याचार केल्यामुळे शांतीप्रिय बौद्धांनी संघटित क्रांती करून रोहिंग्यांना देशातून हद्दपार केले. अशा आतंकवादी विचारसरणीच्या रोहिंग्या मुसलमानांना भारतात थारा देणे म्हणजे भविष्यातील संकटाला निमंत्रण देण्याप्रमाणे आहे. अशा आतंकवादी विचारसरणीच्या रोहिंग्या मुसलमानांचे खरे रूप सर्वांसमोर यावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ ऑगस्ट या दिवशी ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की…’ या विशेष ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
वार, दिनांक आणि वेळ :- शनिवार, १४ ऑगस्ट २०२१, रात्री ७ वाजता