जुने वाहन भंगारात काढल्यावर मिळणार्‍या प्रमाणपत्राद्वारे नवीन वाहन खरेदी केल्यावर त्याची नोंदणी आणि पथकर यांत सूट मिळेल ! – पंतप्रधान मोदी यांची घोषणा

नवी देहली – भंगारात काढण्यात येणार्‍या गाडीचे एक प्रमाणपत्र वाहन मालकाला मिळेल. यामुळे त्याला नवीन गाडी खरेदी करतांना तिची नोंदणी आणि पथकर यांवर सूट दिली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमामध्ये केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जुन्या गाड्यांची वैज्ञानिक पद्धतीने चाचणी केली जाईल आणि त्यानंतर भंगारात काढण्याची प्रक्रिया चालू होईल. यामुळे वाहननिर्मिती आणि धातू यांच्याशी संबंधित आस्थापनांना मोठा लाभ होऊ शकेल. तसेच भंगाराच्या व्यवसायात काम करणार्‍या लोकांनाही याचा लाभ होईल.