बेळगाव येथील धर्मांधाच्या मालकीच्या ‘नियाज हॉटेल’ने विज्ञापनाद्वारे केले हिंदु साधूंचे अश्लाघ्य विडंबन !
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर हॉटेलच्या व्यवस्थापकीय संचालकाकडून क्षमायाचना
|
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
बेळगाव (कर्नाटक) – येथील धर्मांधाच्या मालकीच्या ‘नियाज हॉटेल’ने त्याच्या बिर्याणीचे विज्ञापन करण्यासाठी हिंदु साधूंचे अश्लाघ्य विडंबन केले. याविरोधात विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी तीव्र आक्षेप घेत हॉटेलच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची बेळगावच्या पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी शहरातील हॉटेलच्या विविध शाखांना टाळे ठोकले असून हॉटेल्सच्या बाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. (चुकीचे कृत्य करणार्यांना संरक्षण पुरवण्यापेक्षा त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक) नियाज हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक ईर्शाद सौदागर यांनी हिंदूंच्या भावना दुखावणारे पोस्टर काढून हिंदूंची क्षमा मागितली आहे, असे वृत्त ‘दैनिक लोकमत’च्या इंग्रजी संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आले आहे. (हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावर मागितलेल्या क्षमेला काही एक अर्थ नाही. हॉटेलच्या संबंधितांवर कारवाई व्हावी, हीच हिंदूंची मागणी आहे ! – संपादक)
१. बेळगाव येथील नियाज हॉटेलने सामाजिक माध्यमांतून त्याच्या मांसाहारी बिर्याणीचे ‘पोस्टर’ (प्रसिद्धीपत्रक) प्रसारित केले आहे. त्यात एक हिंदु संत भक्तांना संबोधित करतांना दाखवण्यात आले आहे. या चित्राच्या वर ‘नियाज’ची बिर्याणी खाल्ल्यानंतर गुरुजींची प्रतिक्रिया !’ असे लिहिले असून खाली ‘बलीदान नको, बिर्याणी द्या !’ असे हिंदु संत म्हणत असतांना दाखवले आहे.
२. यासमवेतच पोस्टरवर ‘आमची बिर्याणी अन्य ठिकाणी बनवण्यात येणार्या बिर्याणींना उद्देशून म्हणते, ‘अहं ब्रह्मास्मि ।’ (मी ब्रह्म आहे)’ अशा प्रकारे लिहून हिंदूंच्या महान श्लोकाचेही विडंबन करण्यात आले आहे.
३. सौदागर यांनी म्हटले आहे की, आमच्या विज्ञापनामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यांची आम्ही जाहीर क्षमायाचना करतो. आमच्याकडे काम करणारे, माझे मित्रमंडळ आणि ग्राहक हे विविध जातीधर्मांतील आहेत. देशातील सभ्यतेचा आदर केला पाहिजे आणि देशाच्या प्रगतीत आपण सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे. तरी यामुळे ज्यांचे हृदय दुखावले गेले असेल, त्यांची आम्ही क्षमा मागतो. यापुढे असे होणार नाही, याची दक्षता घेऊ.’ (एकीकडे देशातील सभ्यतेचा आदर केला पाहिजे, असे म्हणायचे आणि दुसरीकडे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विज्ञापन प्रसिद्ध करायचे, हा दुतोंडीपणा आहे ! – संपादक)