शाळेच्या दाखल्यावर जन्मदिनांक असेल, तर आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे जन्मदिनांकाचा पुरावा ठरत नाहीत ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – शाळेच्या दाखल्यावर जन्मदिनांकाचा उल्लेख असेल, तर आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांना वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरावेच, असे बंधनकारक नाही, असा निर्णय येथील अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना दिला आहे.