विदेशी ‘वीगन’ दुधाला भारतात प्रस्थापित करण्यासाठी ‘अमूल’च्या दुधाला विरोध करण्याचे ‘पेटा’चे षड्यंत्र ! – नीरज अत्री, अध्यक्ष, श्री विवेकानंद कार्य समिती

प्रतिकात्मक छायाचित्र

‘अमेरिकेत सोयाबीनमध्ये जनुकीय परिवर्तन करून त्यापासून ‘वीगन मिल्क’ बनवले जाते. भारतात गायीच्या दुधाची मोठी बाजारपेठ आहे. त्यावर विदेशी आस्थापनांचे अधिपत्य निर्माण करण्यासाठीच ‘पेटा’ ही प्राणीप्रेमी संस्था ‘अमूल’च्या दुधाला विरोध करत आहे. ‘वीगन मिल्क’ बनवतांना कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे व्यक्तीला कर्करोग होण्याची शक्यता निर्माण होते. कर्करोग रुग्णालयातही यांचेच लोक आहेत. ‘पेटा’ने वर्ष २००९ मध्ये २ सहस्र ३६६ प्राण्यांना रस्त्यावरून उचलले. त्यातील २ सहस्र ३०१ प्राण्यांची हत्या करण्यात आली. ही ‘पेटा’ची प्राण्यांप्रती नैतिकतेची वागणूक आहे का ?’