पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच बेळगाव जिल्हा येथे पोलीस अन् प्रशासन यांना दिली निवेदने !
हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ अभियान
१५ ऑगस्टच्या निमित्ताने भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करतांना नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, या दृष्टीने हिंदु जनजागृती समितीकडून प्रतिवर्षी मोहीम राबवली जाते. या मोहिमेच्या अंतर्गत पोलीस, प्रशासन, लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन इत्यादींना निवेदने देऊन राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयी जनजागृती करण्यात येते. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणार्यांवर कारवाई करावी, तसेच १६ ऑगस्ट या दिवशी रस्त्यांवर इतरत्र पडलेल्या राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी संबंधित यंत्रणेला योग्य ते आदेश देण्यात यावेत, अशा मागण्या निवेदनामध्ये करण्यात आलेल्या आहेत. गेली अनेक वर्षे ही मोहीम राबवण्यात आल्यामुळे तिचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यात यश आले आहे. या वर्षी जिल्ह्यांमध्ये दिलेल्या निवेदनांची वृत्ते पाहूया.
कोल्हापूर
१. इचलकरंजी – येथे अपर तहसील कार्यालय येथे अपर कारकून शिल्पा चिखलीकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी रजनीकांत रणदिवे, नंदकुमार एडके, प्रकाश तेलवे, सोमेश तेवले, आकाश रणदिवे, निलेश एडके उपस्थित होते.
२. गडहिंग्लज – येथे उपअधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात, प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर यांनी, तसेच पंचायत समिती कार्यालयात गट शिक्षणाधिकारी एन्.बी. हालबागोळ यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी सौ. सुधा बिलावर, सर्वश्री वासू बिलावर, दत्ताराम पाटील, सिद्धराम कब्बुरे उपस्थित होते.
३. कागल – येथे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेना शहरप्रमुख श्री. किरण कुलकर्णी, श्री. शंभुराजे कुलकर्णी, धर्मप्रेमी श्री. दत्तात्रय इनामदार आणि श्री. रुद्राप्पा पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर उपस्थित होते.
बेळगाव
१. बेळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात, पोलीस आयुक्त कार्यालयात, तसेच शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी सौ. मिलन पवार, श्री. सदानंद मासेकर, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. उज्ज्वला गावडे, श्री. सुधीर हेरेकर उपस्थित होते.
२. निपाणी (जिल्हा बेळगाव) येथे तहसीलदार कार्यालयात तहसीलदार मोहन भानसे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्री. अमोल चेंडके, श्रीराम सेनातालुकाध्यक्ष श्री. राजू कोपार्डे, धर्मप्रेमी श्री. राजेंद्र गुरव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. निंगौडा पाटील उपस्थित होते.
सांगली
१. सांगली – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका येथे उपायुक्त राहुल रोकडे, उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, स्थायी समिती सभापती श्री. पांडुरंग कोरे, भाजप नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, नगरसेविका सौ. सुनंदा राऊत यांना निवेदन देण्यात आले.
सांगली येथील नवजीवन शाळा आणि स्व. श्रीमंतीबाई सातगोंडा पाटील (मजलेकर) प्रॅक्टिसिंग स्कूल सांगली, येथे निवेदन देण्यात आले.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका येथे उपायुक्त राहुल रोकडे यांनी निवेदन स्वीकारल्यावर त्वरित मारुति रस्ता आणि हरभट रस्ता येथे तात्काळ पहाणी करून प्लास्टिकचे ध्वज आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले.
२. विटा – येथे नायब तहसीलदार श्रीमती प्रतिक्षा भूते यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अलका रोकडे, सौ. पद्मा चोथे, सौ. अमृता गुळवणी उपस्थित होत्या.
विटा येथील इंदिराबाई भिडे कन्या शाळा, लीलाताई देशचौगुले शाळा, मॉर्डन हायस्कूल येथील शाळांना निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यात धर्मप्रेमी सौ. पद्मनी सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला. लीलाताई देशचौगुले शाळेतील शिक्षकांनी समितीचे कौतुक करून, ‘तुमचा उपक्रम स्तुत्य असून प्रत्येक वर्षी तुम्ही निवेदन देता’, असे आर्वजून सांगितले.
३. जत – येथे पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सुरेखा मिसाळ यांनी निवेदन स्वीकारले. समितीचे निवेदन सर्वत्र पाठवू, असे त्यांनी सांगितले. उप विभागीय कार्यालयात प्रांत अधिकारी प्रशांत आवटे यांना, उपतहसीलदार कार्यालयात उपतहसीलदार गुरुबसू लक्ष्मण शेट्टेप्पागोळ यांना, रामराव विद्यामंदिर येथे शिक्षक संभाजी सरक यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी शिक्षक संभाजी सरक म्हणाले, ‘‘तुम्ही प्रसारित करत असलेल्या राष्ट्र आणि धर्म विषयक पोस्ट मला पाठवा.’’ या वेळी सनातन संस्थेचे साधक श्री गुरुबसव हत्ती, सौ. नीला हत्ती, सौ. अंबिका माळी, सौ. रुक्मिणी सपकाळ उपस्थित होत्या.
४. बत्तीसशिराळा – येथे नायब तहसीलदार अरुणकुमार कोकाटे आणि पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी राजेंद्र खुर्द, राजवर्धन देशमुख, अशोक मस्कर उपस्थित होते.
सातारा
वडूज – येथील ठाणे अंमलदार देशमुख आणि तहसीलदार किरण जमदाडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी भाजपचे अमर जाधव, उद्योजक गोविंद भंडारे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री रमेश गोडसे, विनायक ठिगळे उपस्थित होते. या वेळी तहसीलदार किरण जमदाडे यांना कार्यकर्त्यांनी समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. समितीचे कार्य ऐकल्यानंतर तहसीलदार जमदाडे यांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले.
फलटण – येथील निवासी नायब तहसीलदार रमेश पाटील यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. उदय ओघर्डे, श्री. मंगेश खंदारे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सोलापूर, लातूर, धाराशिव यांसह विविध ठिकाणी प्रशासकीय कार्यालय, पोलीस आणि शिक्षण विभाग येथे निवेदन सादर !
सोलापूर – १५ ऑगस्टच्या निमित्ताने दुकानांतून, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. अशोकचक्रासह तिरंग्याचा मास्क बनवणे आणि वापरणे हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमान असून दंडनीय अपराध आहे. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता असल्याने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
प्लास्टिकच्या राष्ट्रध्वज विक्रेत्यांसमवेत उत्पादकांवरही कारवाई करू ! – गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी, सोलापूर
सोलापूर – येथील उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना याविषयी निवेदन देण्यात आले, तसेच पोलीस आयुक्त सोलापूरच्या वतीने पोलीस निरीक्षक बाळासाहेब उन्हाळे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी सर्वश्री संदीप ढगे, रमेश आवार, किरण पवार, बालराज दोंतुल, विजय माळगे आणि धनंजय बोकडे हे राष्ट्रप्रेमी उपस्थित होते. या वेळी उपजिल्हाधिकारी म्हणाले की, ‘तुम्ही करत असलेला उपक्रम चांगला असून आम्ही याविषयी नक्की लक्ष घालू आणि प्लास्टिकच्या राष्ट्रध्वज विक्रेत्यांसमवेत उत्पादकांवरही कारवाई करू.’
सांगोला (जिल्हा सोलापूर) – येथील तहसीलदार यांच्या वतीने महसूल नायब तहसीलदार शुभांगी अभंगराव यांनी, तर गटशिक्षणाधिकारी यांच्या वतीने वरिष्ठ साहाय्यक बंडू नागणे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष पाटणे आणि सनातन संस्थेच्या सौ. शुभांगी पाटणे उपस्थित होते.
पिलीव (जिल्हा सोलापूर) – येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री. नागेश कलढोणे (सर), केंद्रप्रमुख श्री. राजकुमार फासे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. प्रशांत महामुनी, उपाध्यक्ष सौ. स्मिता देवकर, शिक्षणतज्ञ श्री. उमेश देशमुख, सौ. सारिका जामदार, ग्रामपंचायत सदस्य श्री. दत्तात्रेय बोडरे, माजी सदस्य श्री. अविनाश जेऊरकर यांसह अन्य शिक्षक आणि सदस्य यांना महत्त्व सांगून निवेदन देण्यात आले. या वेळी ‘हे निवेदन वाडी वस्तीवरील आणि केंद्रातील १४ शाळांना पाठवतो’, असे अधिकार्यांनी सांगितले. या वेळी विजय देवकर आणि स्मिता देवकर हे राष्ट्रप्रेमी उपस्थित होते.
बार्शी (जिल्हा सोलापूर) – येथील तहसीलदार सुनील शेरखाने यांना निवेदन देण्यात आले, तसेच येथील पोलीस ठाणे येथेही निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री. तानाजी गोरे, बालाजी शिंदे, अनिल जाधव आणि धीरज रोडे आदी उपस्थित होते.
धाराशिव – येथील निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि शिक्षणाधिकारी गजानन सुसर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संतोष पिंपळे, शुभम मगर, भगवान श्रीनामे, समर्थ पिंपळे आदी उपस्थित होते.
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – येथील नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे आणि पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री विनायक माळी, दीपक पलंगे, संदीप शिरसट, नितीन लोखंडे, सचिन यादव, उमेश कदम, सागर सुरवसे, सुरज सुरवसे, विजय भोसले, प्रदीप जाधव आदी राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.
लातूर – येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाच्या धम्मप्रिया गायकवाड यांनी निवेदन स्वीकारले. छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे पद संचालक श्री. सुरेश लखनगावे यांनाही निवेदन देण्यात आले. यासमवेतच येथील शिवाजीनगर पोलीस ठाणे येथेही निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. गणेश पाटील आणि श्री. बालाजी बनसोडे उपस्थित होते.
अंबाजोगाई (जिल्हा बीड) – येथील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात वरिष्ठ लिपिक सूर्यकांत गायकवाड यांनी निवेदन स्वीकारले, तर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात एस्.बी. रोडे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मंगेश बारस्कर, बालाजी भारजकर आणि आकाश चौरे आदी उपस्थित होते. या निवेदनावर विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या १२ सदस्यांनी स्वाक्षर्या केल्या होत्या.
बीड – येथे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. शेषेराव सुसकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन दिले.