देहली येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्रावण सोमवार, कावड यात्रा आणि नागपंचमी आदी सणांविषयी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन !
देहली – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने देहली येथील श्रावण सोमवार, कावड यात्रा आणि नागपंचमी या सणांविषयी नुकतेच ‘ऑनलाईन’ प्रवचन घेण्यात आले. या वेळी संस्थेच्या सौ. राजरानी साहू यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये जिज्ञासूंसाठी श्रावण सोमवार, कावड यात्रा, तसेच ‘श्रावण मासामध्ये भगवान शिवाची उपासना का करतात ?’ यांविषयीची माहिती सांगितली. सौ. संगीता गुप्ता यांनी ‘नागपंचमीचे पूजन कसे करावे ?, नागदेवतेला प्रार्थना कशी करावी ?’ यांविषयीची माहिती सांगितली. सौ. गुप्ता यांनी नागपंचमीविषयी असलेल्या शंकांचे निरसन केले. सत्संगामध्ये सांगितलेली माहिती सर्वांना अतिशय आवडली. देहली आणि एन्सीआर् येथील जिज्ञासूंनी या सत्संगाचा लाभ घेतला.