वाराणसी सेवाकेंद्रात गुरुपादुका प्रतिष्ठापना सोहळ्याच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती
२३.३.२०१९ या दिवशी वाराणसी सेवाकेंद्रात गुरुपादुकांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांची) प्रतिष्ठापना करण्यात आली. १३ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात गुरुपादुकांचे पूजन होत असतांना साधकांना आलेल्या अनुभूती आपण पाहिल्या. आज उर्वरित अनुभूती येथे दिल्या आहेत.
मागील अनुभूती वाचण्यासाठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/502518.html
२. आरतीच्या वेळी आलेल्या अनुभूती
अ. ‘आरती चालू असतांना ‘यज्ञ होत आहे’, असे मला वाटले.’ – श्रीमती सुनीता गुप्ता आणि श्रीमती अमरावती सिंह
आ. ‘आरतीनंतर मला परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्री लक्ष्मीदेवी यांचे दर्शन झाले.’ – श्रीमती अमरावती सिंह
इ. ‘आरतीच्या प्रत्येक शब्दाच्या वेळी माझ्या रोमा-रोमांत कंपने निर्माण होत होती. त्यानंतर मला परात्पर गुरुदेव दिसले.’ – श्रीमती संगीता देवी
ई. ‘पू. नीलेश सिंगबाळ आरती करत असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हात जोडून बसले आहेत’, असे मला जाणवले.’ – श्रीमती अमृता मौर्या, वाराणसी
३. गुरुपूजनाच्या वेळी श्रीमती भाग्यश्री आणेकर यांनी अनुभवलेली भावावस्था
अ. ‘गुरुपादुकांच्या प्रतिष्ठापनेच्या आरंभी प्रार्थना करत असतांना माझे शरीर हलके होत गेले. ‘आम्ही सर्व साधक स्वर्गात किंवा श्रीमहाविष्णूच्या वैकुंठधामात आहोत’, असे मला वाटत होते.
आ. ‘गुरुपादुका पूजनाला काशीविश्वेश्वर, कालभैरव, सर्व ऋषिमुनी, देवी-देवता आणि नारदमुनी आले आहेत’, असे मला जाणवले. सूर्यनारायणाच्या तेजस्वी प्रकाशात श्रीनारायणाचे चतुर्भुज रूपात दर्शन झाले.
इ. मी शरणागतभावाने श्री महालक्ष्मीदेवीला प्रार्थना करत होते. त्या वेळी मला कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीदेवीचे चरणांपासून ते तिच्या गळ्यापर्यंत दर्शन झाले. त्यानंतर मला श्री महालक्ष्मीदेवीच्या रूपात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ दिसल्या. नाकात नथ आणि नऊवारी साडी नेसलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ थोडेसे वाकून कुणाशी तरी बोलत होत्या. त्यांनी सगळ्यांकडे पाहिले.
ई. गुरुपूजा सांगणारे श्री. गुरुराज प्रभु यांच्या जागी ‘श्री गणेश पौरोहित्य करत आहे आणि पू. नीलेशदादा प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणांचे पूजन करत आहेत’, असे मला दिसले.
उ. ‘प्रभु श्रीराम आणि सीता यांची पूजा चालू आहे अन् मारुति आनंदावस्थेत सर्वांना प्रसाद देत आहे. हा लक्ष्मी-नारायणाचा सोहळा महाविष्णुलोकात होत आहे. सगळे जण भावावस्थेत आहेत’, असे मला काही क्षण जाणवले. त्या वेळी वातावरणात निळसर, पांढर्या आणि मधेच पिवळसर रंगाच्या प्रकाशाची छटा दिसत होती. हे सर्व अवर्णनीय होते.
ऊ. आरती चालू असतांना ‘प.पू. भक्तराज महाराज प.पू. गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉक्टरांना) काहीतरी सांगत आहेत’, असे मला जाणवले. त्यानंतर ‘प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु श्री अनंतानंद साईश हे प.पू. भक्तराज महाराज यांच्यावर फुलांचा वर्षाव करत असून तो प.पू. गुरुदेवांच्या मस्तकावर होत आहे, तसेच प.पू. गुरुदेवांच्या हृदयात आश्रमातील साधक आहेत’, असे दृश्य मला दिसले. ‘हे दृश्य पहात रहावे’, असे मला वाटत होते. त्या वेळी मला माझ्या अस्तित्वाची क्षणभरही जाणीव नव्हती.
ए. मी प्रार्थना करत असतांना मला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ शरणागतभावाने नमस्काराच्या मुद्रेत दिसल्या. त्या ध्यानावस्थेत असल्याचे मला जाणवले.
ऐ. माझ्या मनाला अत्यानंद होत होता. कृतज्ञताभावाने माझे नेत्र भरून आले आणि हृदय दाटून आले. त्यानंतर मला सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे दर्शन झाले.’
(समाप्त)
– श्रीमती भाग्यश्री आणेकर, वाराणसी सेवाकेंद्र (२५.३.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |