सारथी फाऊंडेशनच्या वतीने १५ ऑगस्टच्या निमित्ताने बालगंधर्व नाट्यमंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन !
मिरज, १३ ऑगस्ट (वार्ता.) – सद्यःस्थितीत वैद्यकीय क्षेत्रातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन पू. संतोष दाभाडेमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली सेवारत असलेल्या सारथी फाऊंडेशनच्या वतीने १५ ऑगस्टच्या निमित्ताने बालगंधर्व नाट्यमंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन सकाळी १० वाजता कर्नल एस्.के. बाबू यांच्या हस्ते होणार आहे. तरी या रक्तदान शिबिरासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पू. संतोष दाभाडेमाऊली आणि सारथी फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी पू. संतोष दाभाडेमाऊली – ८६००९४७७८९, श्री. चेतन दाभाडे – ९४२३०३७८३३ यांना या क्रमांकावर संपर्क साधावा.