नागपूर येथील तांदूळ घोटाळ्यात अनेक अधिकारी आणि मालक अडकण्याची शक्यता !

स्वस्त धान्य दुकानदार संघटनांच्या प्रतिनिधींकडून देवेंद्र फडणवीस यांची भेट

नागपूर – विदर्भातील स्वस्त धान्य दुकानांत झालेल्या तांदूळ घोटाळा प्रकरणात अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी आणि ‘राईस मिल’चे मालक अडकण्याची शक्यता स्वस्त धान्य दुकानदारांकडून व्यक्त केली जात आहे. याविषयी नागपूर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गुड्डू अग्रवाल यांनी ११ ऑगस्ट या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली.

त्यामुळे येत्या काळात भाजपच्या वतीने तांदूळ घोटाळ्याच्या प्रश्नावर आंदोलन होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील तांदूळ घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत तांदूळ घोटाळ्याची व्याप्ती पसरलेली आहे; पण अजून घोटाळ्याची चौकशी झालेली नाही.