नवी मुंबई मनसे शहर अध्यक्षांच्या विरोधात गुन्हा नोंद !
पत्नीकडून छळवणुकीची पोलिसात तक्रार
नवी मुंबई – नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्याविरुद्ध त्यांच्या पत्नीने शारीरिक आणि मानसिक छळवणूक केल्याची तक्रार नेरूळ पोलीस स्थानकामध्ये प्रविष्ट केली आहे. काही वर्षांपासून पती मारहाण करत असल्याचा आरोपही पत्नीने केला आहे. गजानन काळे हे पत्नीला रंग आणि जात यांवरून सतत टोमणे मारणे, प्रसंगी जातीवाचक शिवीगाळ करणे असे प्रकार करत होते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक छळवणूक करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमांखाली गजानन काळे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.