परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीबाहेर नागाची आकृती दिसल्यावर ‘नागदेवता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रक्षणासाठी दाराबाहेर उभी आहे’, असे जाणवणे
‘एकदा मी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी सेवेसाठी जात होतो. त्या वेळी माझे लक्ष सहजपणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीकडे गेले. खोलीच्या मुख्य दाराबाहेर उजव्या बाजूला मला एका नागाची आकृती वायूरूपात (पांढर्या रंगाची) स्पष्टपणे दिसली. मला ३ – ४ सेकंद ही आकृती दिसली. मला सेवेची घाई असल्याने मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि सेवेला गेलो. त्यानंतर मी सेवा करत असतांना माझ्या मनात विचार आला, ‘नागदेवता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रक्षणासाठी दाराबाहेर उभी आहे.’
– श्री. अमित डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.७.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |