रामनाथी (गोवा) येथे झालेल्या नागपूजेच्या संदर्भात साधिकेला सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे आणि साधकांना आलेल्या अनुभूती

२६.२.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात झालेल्या नागपूजेच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

अ. नागपूजा चालू झाल्यावर मला ग्लानी येत होती.

आ. पूजा चालू होण्यापूर्वी श्री अनंत नागाचे दर्शन झाले. तो पुष्कळ मोठा असून ‘श्रीविष्णूच्या चरणांशी आला आहे’, असे जाणवले.

इ. नागपूजेचा संकल्प चालू झाला आणि लगेचच विविध रंगांचे नाग पूजास्थळी आल्याचे जाणवले.

ई. नागपूजेसाठी पितळ्याची नागाची प्रतिमा ठेवलेली होती. ती जिवंत वाटून तिच्या हालचाली होतांना जाणवल्या.

उ. नागपूजेच्या अभिषेकाच्या वेळी सनातन पुरोहित पाठशाळेचे संचालक ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दामोदर वझेगुरुजी मागे बसलेले सर्व साधक सर्पांची विविध नावे म्हणत होते. त्या वेळी माझे ध्यान लागले आणि एका सर्पाचा माझ्या डाव्या पायाला स्पर्श झाल्याचे मला जाणवले. त्याच वेळी अनेक सर्प माझ्या आजूबाजूला असल्याचे आणि ‘आम्ही तुझ्या रक्षणासाठी आलो आहोत. तुला कसलेही भय नाही’, असे सांगत असल्याचे जाणवले.

– कु. रजनीगंधा कुर्‍हे (फेब्रुवारी २०१९)

अनुभूती

कु. रजनीगंधा कुर्‍हे

नागपूजेच्या आदल्या दिवशी साधिकेला स्वप्न पडून छातीवर दाब जाणवून त्रास होणे आणि त्यानंतर गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना होणे : ‘२६.२.२०१९ या दिवशी ‘नागपूजा आहे’, हे मला ठाऊक नव्हते. आदल्या दिवशी, म्हणजे २५.२.२०१९ या दिवशी पहाटे मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मला एक पूर्ण पांढरी व्यक्ती दिसली. तिचे डोळे आणि संपूर्ण अंग पांढरे होते; परंतु पायाकडील भाग हा सापाच्या शेपटीसारखा होता. तसेच ती व्यक्ती मरणासन्न अवस्थेत दिसली. त्याच वेळी स्वप्नात ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंना कुणीतरी मारले’, असे साधकांकडून कळले आणि मी झोपेतून जागी झाले. तेव्हा सकाळचे ६ वाजले होते. मला खोलीत आणि माझ्या छातीवर पुष्कळ दाब जाणवत होता. त्याच सायंकाळी मला कळले की, श्रीचित्शक्ति गाडगीळकाकूंनाही पुष्कळ त्रास होत होता आणि त्यांना दुपारी ३ घंटे विश्रांती घ्यावी लागली होती.

‘गुरुदेवा, या नागपूजेच्या माध्यमातून आम्हा साधकांना असलेले कर्मदोष, सर्पदोष आणि त्रास दूर होत आहेत, याची आम्हाला कल्पनाही नाही. आमची गुरुमाऊली इतकी थोर आहे की, देवाने साधकांना त्यांच्या प्रारब्धावर सोडले असतांना केवळ गुरुमाऊलीने सर्व साधकांचे त्रास स्वतःवर घेऊन साधकांसाठी मोक्षाचे द्वार उघडले आहे. गुरुमाऊली, तूच तुझ्या कोमल चरणांजवळ घे, अशी तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना.’

डॉ. (कु.) आरती तिवारी

१. देवतेच्या तत्त्वानुसार नृत्याचे स्मरण होत आहे, याची जाणीव होणे : ‘२५.२.२०१९ या दिवशी रात्री ८ वाजता मला सतत श्रीविष्णु आणि शेषनाग यांचे स्मरण होत होते. त्यानंतर मी नारायणाचे गाणे म्हणत त्याच्यासमोर ‘नृत्य करत आहे’, असे दिसत होते. दुसर्‍या दिवशी दुपारी सर्पयागाला उपायांसाठी बसल्यावर आणि अष्टनागांची पूजा चालू असतांना नारायणाचे गाणे अन् नृत्याचे दृश्य दिसतांना अकस्मात् अनुभूतीची आठवण झाली. तेव्हा ‘देवतेच्या तत्त्वानुसार नृत्याचे स्मरण होते’, असे वाटून कृतज्ञता व्यक्त झाली.

२. त्या दिवशी दिवसभर मन प्रसन्न असून हलके हलके वाटत असणे : त्या दिवशी माझी संपूर्ण दिवस प्रसन्नता टिकून होती. दुपारी सर्पयाग विधी होता. तेव्हाही नामजप, प्रार्थना चांगल्या प्रकारे होत होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत माझी सेवा चालू होती, तरी मनात इतर कोणतेच विचार नव्हते. मला हलके हलके वाटत होते.’

श्री. भूषण कुलकर्णी

१. सर्पपूजेच्या वेळी सूक्ष्मातून शेषनागाचे दर्शन होणे : ‘सर्पपूजेच्या वेळी सूक्ष्मातून मला शेषनागाचे दर्शन झाले आणि पूजेमध्ये करण्यात येत असलेले विधी स्वीकारले जात असल्याचे दिसत होते. याच वेळी शेषनाग संस्थेच्या साधकांना त्रासदायक शक्तीच्या माध्यमातून होत असलेले शारीरिक त्रास आणि साधकांच्या शरिरातील त्रासदायक शक्ती खेचून घेत असल्याचे सूक्ष्मातून जाणवले. हा भाग चालू असतांनाच शेषनाग आणि अनिष्ट शक्ती यांच्यात सूक्ष्मातून युद्ध चालू असल्याचे जाणवत होते. (प्रत्यक्षातही अनिष्ट शक्तींनी सर्प पूजनाच्या वेळी हॅलोजन फोडून पूजनात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. – संकलक)

२. सर्पपूजेच्या वेळी नागाला एक प्रकारचा जो गंध येतो, तो सूक्ष्मातून जाणवला.’

सौ. स्नेहा भोवर

नागदेवतेची पूजा चालू असतांना देवतेच्या मूर्तीत जिवंतपणा वाटणे : ‘प्रत्यक्ष नागदेवतेची पूजा चालू असतांना मूर्तीत जिवंतपणा वाटत होता. त्या वेळी बाजूला नागदेवता फणा काढून उभी होती. नागदेवतेला साष्टांग नमस्कार घालायला साधकांना सांगितले असता ‘नागदेवता स्वतः साष्टांग नमस्कार घालत असल्याचे जाणवले’, असे दिसत होते.’

(फेब्रुवारी २०१९)

रामनाथी आश्रमात नागदेवतेच्या पूजनाच्या वेळी नागदेवतेला अर्पण केलेला नैवेद्य नागदेवतेने ग्रहण केल्याचे आणि फणा काढून सर्वांना आशीर्वाद दिल्याचे दृश्य दिसणे

श्रीमती शर्मिला पळणीटकर

‘२६.२.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात नागदेवतेचे पूजन होते. प्रमुख पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांना कलशातील नागदेवतांना नैवेद्य अर्पण करण्यास सांगितले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई नागदेवतेला नैवेद्य अर्पण करत असतांना आपोआप माझे डोळे मिटले गेले आणि मला ‘नागदेवता प्रसाद ग्रहण करत आहे आणि त्यानंतर ती फणा काढून डोलत सर्वांना आशीर्वाद देत आहे’, असे दृश्य दिसले. मी डोळे उघडले, तरीही माझ्या डोळ्यांसमोर ते दृश्य ५ ते ७ मिनिटे दिसत होते. त्या वेळी माझी भावजागृती झाली आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. ‘गुरुदेवा, हे तुम्हीच लिहून घेतलेत. ते तुमच्या चरणी अर्पण करते.’

– श्रीमती शर्मिला पळणीटकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.२.२०१९)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.