पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अपंगांचे आंदोलन !

अपंगांना आंदोलन का करावे लागते ? शासन सरकार त्यांच्या समस्यांमध्ये स्वतःहून लक्ष का घालत नाही ? – संपादक 

पुणे – सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांत दिव्यांग हक्क कायदा आणि शासन निर्णयाची कार्यवाही करावी, या मागणीसाठी अपंगांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. प्रहार अपंग क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या वेळी उपविभागीय आयुक्त पाटील यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले.

प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने केलेल्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत.

१. अपंगांना विभक्त शिधापत्रिका पिवळी शिधापत्रिका दिली जात नाही.

२. काही अपंग प्रवर्गांना दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्र मिळत नाही.

३. संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी असणार्‍या अनेक प्रकरणांना अनुमती मिळावी. त्यांचा निपटारा व्हावा.

४. घरकुल मिळण्यासाठी अर्ज केलेली अनेक प्रकरणे जिल्हा परिषद पंचायत समिती कार्यालयात पडून आहेत.