जमशेदपूर (झारखंड) येथे ‘जे.सी.सी.एन्. केबल नेटवर्क’च्या माध्यमातून प्रतिदिन ‘ऑनलाईन’ नामजप सत्संगाचे प्रसारण

जमशेदपूर (झारखंड) – २ ऑगस्टपासून येथील ‘जे.सी.सी.एन्. केबल नेटवर्क’च्या चॅनलवर प्रतिदिन सकाळी ७ वाजता सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रसारित करण्यात येणारा ‘ऑनलाईन नामजप सत्संग’ या विशेष कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येत आहे. हे प्रसारण २ ऑगस्टपासून चालू झाले असून ‘सिटी केबल चॅनल क्रमांक २७६’ या क्रमांकावर या कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे. ‘जे.सी.सी.एन्. केबल नेटवर्क’चे संचालक श्री. संदीपकुमार सिंह यांनी सांगितले की, नामजप सत्संगाचा कार्यक्रम प्रतिदिन ५५ सहस्र लोकांपर्यंत पोचतो.

‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या ध्वनीचित्रफितीचे प्रसारण

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २४ जुलै या दिवशी ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची ध्वनीचित्रफीत येथील स्थानिक ‘जे.सी.सी.एन्.  केबल नेटवर्क’वर प्रसारित करण्यात आली. तसेच तळपट्टीच्या माध्यमातून कार्यक्रमाचे विज्ञापनही करण्यात आले होते. या कार्यक्रमाने प्रभावित होऊन ‘जे.सी.सी.एन्. केबल नेटवर्क’चे संचालक श्री. संदीपकुमार सिंह यांनी सनातन संस्थेच्या वतीने दाखवण्यात येणारे अन्य ‘ऑनलाईन’ कार्यक्रम प्रसारित करण्याची इच्छा व्यक्त केली होती.