वाराणसी सेवाकेंद्रात गुरुपादुका प्रतिष्ठापना सोहळ्याच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

२३.३.२०१९ या दिवशी वाराणसी सेवाकेंद्रात गुरुपादुकांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांची) प्रतिष्ठापना करण्यात आली. त्या वेळी ध्यानमंदिरात गुरुपादुकांचे पूजन होत असतांना साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. गुरुपादुका पूजनाच्या वेळी आलेल्या अनुभूती

श्री गुरुपादुका

१ अ. रामनाथी आश्रमात असल्यासारखे वाटणे : ‘वाराणसी सेवाकेंद्रात आल्यावर ‘मी रामनाथी आश्रमात आहे’, असे मला वाटले.’  – श्रीमती अमरावती सिंह आणि श्री. देवेश कुमार सिंह

१ आ. ‘गुरुपादुका पूजनाच्या वेळी मला मोगर्‍याचा सुगंध येत होता.’ – श्रीमती अमरावती सिंह

१ इ. ‘प्रत्यक्ष गुरुदेव आश्रमात आले आहेत’, असे वाटणे

१. ‘गुरुपादुका पूजनाच्या वेळी ‘साक्षात् परात्पर गुरुदेव आश्रमात आले आहेत. ते स्मित हास्य करत आहेत. ते बसले असून त्यांचे चरण त्या पादुकांमध्ये आहेत’, असे जाणवले.’ – श्री. धीरज कुमार, श्री. संदीप सिंह आणि श्री. रवि सिंह

२. ‘या दिवशी मला सेवाकेंद्रातील वातावरण वेगळे वाटत होते. उन्हातही वेगळी शुभ्रता जाणवत होती. पू. नीलेश सिंगबाळ गुरुपादुकांचे पूजन करत असतांना तेथील श्रीरामाच्या प्रतिमेवरील गुलाबाच्या फुलाची एक पाकळी खाली पडली. ‘प्रत्यक्ष परात्पर गुरुदेवच पादुका घालून आसनावर विराजमान आहेत आणि तेथे लक्ष्मीची पावलेही आहेत’, असे मला दिसले.’ – श्रीमती सुनीता गुप्ता

१ ई. ‘गुरुपादुकांमधून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य बाहेर पडत आहे’, असे जाणवणे : ‘एरव्ही मला बाहेर गेल्यावर त्रास होतो; परंतु पादुकापूजनाच्या कार्यक्रमाला येण्याच्या निरोप मिळाल्यावर मला होणारा त्रास उणावू लागला. गुरुपादुका पूजनाच्या वेळी गुरुपादुकांमधून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य बाहेर पडत आहे’, असे मला जाणवले.’ – श्री. रवि सिंह

१ उ. ‘गुरुपादुका पूजनानंतर मला शंखनादाचा ध्वनी ऐकू आला.’ – श्री. जर्नादन सिंह

१ ऊ. परात्पर गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणांचे पूजन होत आहे, असे जाणवणे : ‘पादुका पूजनाच्या वेळी ‘परात्पर गुरुदेव शेषनागावर पहुडले आहेत. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ याही उपस्थित आहेत अन् या तिघांच्याही चरणांचे पूजन होत आहे’, असे मला जाणवले. ‘संपूर्ण वातावरणामध्ये लाल रंग पसरलेला आहे’, असे मला वाटले.’ – श्री. चंद्रशेखर सिंह

१ ए. ‘पादुका पूजनाच्या वेळी श्रीकृष्ण, परात्पर गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन होणे : ‘पादुका पूजनाच्या वेळी श्रीकृष्ण, परात्पर गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे मला दर्शन झाले. मी ‘श्री लक्ष्मीमातेच्या रूपातील श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांची पूजा करत आहे’, असे मला वाटले. गुरुपादुका पूजनातील चैतन्यामुळे माझे मन शांत आणि स्थिर झाले. त्या वेळी मला पुष्कळ थंडावा जाणवला.’ – कु. सुनीता छत्तर.                (२५.३.२०१९)                                      (क्रमश:)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

पुढील अनुभूती वाचण्यासाठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/502686.html