भारताने अफगाणिस्तान सैन्याला भेट दिलेले एम्आय-२४ हेलिकॉप्टर तालिबानच्या कह्यात
काबुल (अफगाणिस्तान) – भारताने अफगाणिस्तानला भेट दिलेले ‘एम्आय-२४’ हे हेलिकॉप्टर तालिबानने कह्यात घेतले आहे. अफगाणिस्तानमधील कांडुज येथील एका छायाचित्रातून हे हेलिकॉप्टर तालिबानी लढाऊ हेलिकॉप्टरच्या शेजारी दिसत आहे. या हेलिकॉप्टरचे ‘रोटर ब्लेड’ (हेलिकॉप्टरवरील पंख्याचे पाते) गायब आहेत. हे ब्लेड तालिबानने हेलिकॉप्टरचा वापर आक्रमण करण्यासाठी वापरू नये, यासाठी अफगाणिस्तानच्या सैन्याने पूर्वीच काढून टाकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वर्ष २०१९ मध्ये भारताने अफगाण वायूदलाला ३ ‘चित्ता’ हेलिकॉप्टर्ससह एम्आय-२४ हे लढाऊ हेलिकॉप्टर भेट दिले होते.
Taliban seizes Mi-35 attack helicopter gifted by India to Afghan forces after they capture the Kunduz airport and local army headquartershttps://t.co/ckqXqfIBES
— OpIndia.com (@OpIndia_com) August 11, 2021