शिवसेना आणि हिंदुराष्ट्र सेना यांच्या प्रयत्नांमुळे दादर रेल्वेस्थानकाच्या बाहेरील हनुमान मंदिरावरील कारवाईला रेल्वे प्रशासनाकडून स्थगिती !
मंदिराच्या रक्षणासाठी पुढाकार घेणारी शिवसेना आणि हिंदुराष्ट्र सेना यांचे अभिनंदन !
शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले आणि हिंदुराष्ट्र सेनेचे मुंबई अध्यक्ष प्रकाश सावंत यांचा पुढाकार !
मुंबई – दादर (पूर्व) रेल्वेस्थानकाच्या बाहेरील पुरातन मारुति मंदिर अनधिकृत असल्याचे घोषित करून रेल्वे प्रशासनाकडून ते पाडण्यात येणार होते. त्याविषयी ३१ जुलै या दिवशी रेल्वे प्रशासनाकडून मंदिराच्या विश्वस्तांना नोटीस पाठवून ७ दिवसांची मुदत देण्यात आली होती. शिवसेनेचे नगरसेवक श्री. अमेय घोले यांनी या कारवाईला विरोध दर्शवला होता. मंदिरावर कारवाई केल्यास शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करण्याची चेतावणी घोले यांनी दिली होती. यासह हिंदुराष्ट्र सेनेचे मुंबई अध्यक्ष प्रकाश सावंत यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकार्यांची भेट घेऊन त्यांना मंदिरावर कारवाई न करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडून ‘आता मंदिरावर कारवाई करण्यात येणार नाही’, असे घोषित करण्यात आले आहे.