श्रीकाकुलम् (आंध्रप्रदेश) येथील पद्मनाभ स्वामी मंदिरातील श्री गणेश आणि श्री सरस्वतीदेवी यांच्या मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड !
मौल्यवान सुरक्षित असल्याने तोडफोडीचाच उद्देश स्पष्ट !
आंधप्रदेशमध्ये यापूर्वीही मोठ्या संख्येने हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे झाल्याच्या घटना एकापाठोपाठ एक घडल्या होत्या. तरीही राज्यातील ख्रिस्ती मुख्यमंत्री असणार्या शासनाकडून मंदिरांच्या सुरक्षेसाठी काहीच प्रयत्न झाले नाहीत, हेच यातून स्पष्ट होते ! त्यामुळे मंदिरांच्या रक्षणासाठी आता हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! – संपादक
श्रीकाकुलम् (आंध्रप्रदेश) – श्रीकाकुलम् जिल्ह्यातील कराकावलसा गावामध्ये पद्मनाभ स्वामी मंदिरातील श्री सरस्वतीदेवी आणि श्री गणेश यांच्या मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. हे मंदिर पर्वतावर असल्याने सध्या केवळ पुजारीच तेथे जात असल्याने ही घटना आता समोर आली आहे. या मंदिरातून कोणत्याही मौल्यवान वस्तूची चोरी झालेली नसल्याने केवळ तोडफोड करण्यासाठीच ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत.
Andhra Pradesh: Temple vandalized in Srikakulam district, no theft reportedhttps://t.co/i4hVqsu9An
— OpIndia.com (@OpIndia_com) August 9, 2021
पोलीस उपअधीक्षक महेंद्र यांनी सांगितले की, आम्ही याचवर्षी जानेवारी मासामध्ये मंदिर समितीला येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास सांगितले होते; मात्र ते लावण्यात आले नाहीत. (सीसीटीव्ही कॅमेर्यामुळे तोडफोड करणार्यांपासून मंदिराचे रक्षण होणार नाही, तर पोलिसांनी संरक्षण दिल्यामुळे ते होणार आहे; मात्र अशा प्रकारचे विधान करून स्वतःचे दायित्व झटकण्याचाच प्रयत्न पोलीस करत आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक)
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |