दोडामार्ग येथे २६ लाख रुपयांच्या अवैध मद्याच्या वाहतुकीच्या प्रकरणी दोघांना अटक
दोडामार्ग – येथील गोवा-महाराष्ट्र या राज्यांच्या सीमेवर असलेल्या तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी करतांना पोलिसांना गोवा येथून पुण्याकडे जाणार्या एका ट्रकमध्ये २६ लाख ४० सहस्र रुपयांचे अवैध मद्य सापडले. पोलिसांनी अवैध मद्य आणि मद्याच्या वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक, असा एकूण ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला. या प्रकरणी चालक अन् त्याचा साहाय्यक यांना अटक करण्यात आली आहे.
(गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अवैध मद्याची वाहतूक केली जाते, हे आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या अनेक कारवायांतून स्पष्ट झाले आहे. याखेरीज पोलिसांना लक्षात येत नसलेल्या कितीतरी मार्गांनी अवैध मद्याची वाहतूक होत असेल, याचा विचारच न केलेला बरा. या समस्येवर महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांची सरकार कायमस्वरूपी निर्णय का घेत नाही, हा मोठा प्रश्न निर्माण आहे ! – संपादक)