गोव्यात दिवसभरात १०३ कोरोनाबाधित
एकही मृत्यू नाही
पणजी – गोव्यात दिवसभरात १०३ कोरोनाबाधित आढळले, तर एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण २.०३ टक्के आहे. यामुळे प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या वाढून ९८३ झाली आहे. गोव्यात आजपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५९ टक्के आहे.