सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ८४ नवीन रुग्ण : ५ जणांचा मृत्यू
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात ११ ऑगस्ट या दिवशी कोरोनाचे ८४ नवीन रुग्ण आढळले, तर ५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र २७८ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४९ सहस्र ५९१ झाली आहे. ११ ऑगस्ट या दिवशी १२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ४६ सहस्र ३०१ झाली आहे. सद्य:स्थितीत २ सहस्र १० रुग्णांवर उपचार चालू आहेत.