किरण सामंत यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांकडे तक्रार करणार ! – नितेश राणे, आमदार, भाजप
सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत प्रशासनात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप
कणकवली – पालकमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रशासनात हस्तक्षेप वाढत चालला आहे. किरण सामंत हे काळा पैसा सिंधुदुर्गच्या राजकारणात वापरत आहेत. भाऊ पालकमंत्री असल्याचा अपलाभ किरण सामंत घेत आहेत. त्यांच्याविषयी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार करणार आहे, अशी माहिती भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार राणे पुढे म्हणाले, ‘‘किरण सामंत पर्ससीन मासेमारांकडून पैसे घेत असल्याचे पुरावे मला मिळाले आहेत. ते मी मत्स्योद्योगमंत्री अस्लम शेख यांच्याकडे दिले आहेत. विधानसभेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात हे पुरावे मी सभागृहात मांडणार आहे.’’